पाण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडचे अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:12 AM2019-04-29T00:12:52+5:302019-04-29T00:13:35+5:30

मागील काही वर्षांपासून चंद्रपूर शहरातील नागरिक अनियमित पाणी पुरवठ्याने हैराण झाले आहेत. नळाला पाणी ४ दिवसांनी पाणी येत आहे. काही वॉर्डात तर एक दिवसही पाणी मिळत नाही. शहरातील ही पाणीबाणी सोडविण्यात अपयश आल्याच्या निषेधार्थ यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात मनपाच्या पाणी कंत्राटदार कार्यालयात शुक्रवारी ‘जोडे मारो’ आंदोलन केले.

Unique movement of water for the Young Pine Bride | पाण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडचे अनोखे आंदोलन

पाण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडचे अनोखे आंदोलन

Next
ठळक मुद्देचंद्रपुरातील पाणीसमस्या : कंत्राटदाराचे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील काही वर्षांपासून चंद्रपूर शहरातील नागरिक अनियमित पाणी पुरवठ्याने हैराण झाले आहेत. नळाला पाणी ४ दिवसांनी पाणी येत आहे. काही वॉर्डात तर एक दिवसही पाणी मिळत नाही. शहरातील ही पाणीबाणी सोडविण्यात अपयश आल्याच्या निषेधार्थ यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात मनपाच्या पाणी कंत्राटदार कार्यालयात शुक्रवारी ‘जोडे मारो’ आंदोलन केले.
साखळीच्या आंदोलनाची सुरुवात यंग चांदा ब्रिगेडच्या सदस्यांनी अध्यक्ष जोरगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा कंत्राटदार यांच्या कार्यालयात धडक मारली. पाणी पुरवठा का अनियमित असतो, असा जाब विचारला असता कंत्राटदाराने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे यंग चांदा ब्रिगेडच्या सदस्यांनी चार दिवसात शहरातील पाणीपुरवठा नियमित करा, अशा इशारा कंत्राटदाराला दिला. त्यानंतर कार्यालयाच्या दरवाज्यावर जोडे मारो आंदोलन केले. सदस्यांनी मनपाविरूद्धही निदर्शने करून शहरातील पाणी पुरवठा नियमित करण्याची मागणी केली.
समस्या सुटली नाही तर रोज कार्यालयात येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे इरफान शेख, राशेद हुसैन, वंदना हातगावकर, कल्याणी शिंदे, नंदा पंधरे, रुपा परसराम, कविता शुक्ला, अनिता देवतळे, पुष्पा प्रसाद, गीता रामटेके, किरण करमनकर, नीलीमा वनकर, राजू काळे, इमरान खान, मोहसीन खान, कुमार जुनमूलवार, हबीब भाई आदींची उपस्थिती होती.

Web Title: Unique movement of water for the Young Pine Bride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.