चंद्रपुरात पार पडला सत्यशोधक पद्धतीने आगळावेगळा विवाह सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:32 AM2021-09-05T04:32:21+5:302021-09-05T04:32:21+5:30

मंगलाष्टकऐवजी फुलांच्या अक्षता, पुस्तकांची भेट, साऊ जोती असा आगळावेगळा विवाहसोहळा होता. समाजहिताचे उपक्रम राबवून समाजाला नेत्रदान वृक्षारोपण, तसेच नागरिकांना ...

A unique wedding ceremony was held in Chandrapur in a truth-seeking manner | चंद्रपुरात पार पडला सत्यशोधक पद्धतीने आगळावेगळा विवाह सोहळा

चंद्रपुरात पार पडला सत्यशोधक पद्धतीने आगळावेगळा विवाह सोहळा

Next

मंगलाष्टकऐवजी फुलांच्या अक्षता, पुस्तकांची भेट, साऊ जोती असा आगळावेगळा विवाहसोहळा होता.

समाजहिताचे उपक्रम राबवून समाजाला नेत्रदान वृक्षारोपण, तसेच नागरिकांना कोविड-१९ काळातील जनजागृती याबद्दलचे महत्त्व कळावे हा हेतू या विवाहातून समाजापुढे ठेवण्यात आला. या विवाहसोहळ्यात अनेक समाजउपयोगी उपक्रम राबविण्यात आले.

जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील रोशन भास्कर रावेरकर आणि चंद्रपूर येथील श्वेता दिनेश कोवे यांचे लग्न जुळले. पण, विवाह सत्यशोधक पद्धतीने करायचा निर्णय रोशन आणि श्वेताने संयुक्तपणे घेतला. या उच्चशिक्षित जोडप्याने सर्व रूढी परंपरांना बाजूला सारत महात्मा जोतिबा फुले यांनी दिलेल्या सत्यशोधक विवाह पद्धतीच्या मार्गाने नव्या संसाराची सुरुवात केली. महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आदिवासीचे जननायक बिरसा मुंडा, बाबुराव शेडमाके व राणी हिराई यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून लग्नविधीच्या कार्याला सुरुवात झाली. यावेळी दोन्ही नवदाम्पत्याने नेत्रदानाचा संकल्प केला. वृक्षारोपण तसेच कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या विवाहाच्या निमित्ताने पत्रके वाटून कोरोना जागृतीचा सामाजिक संदेशही देण्यात आला. येथील पोलीस सभागृहात पार पडलेल्या या विवाहसोहळ्याचे नेत्रशल्य चिकित्सक डॉ. जी. एल. दुधे, नेत्रदान समुपदेशक योगेंद्र इंदोरकर, प्रसिद्ध विचारवंत दिलीप सोळंके, ऑफ्रोटचे जिल्हाध्यक्ष विजय कुमरे, धीरज मेश्राम, अंनिसचे जिल्हा संघटक अनिल दहागावकर साक्षीदार होते.

Web Title: A unique wedding ceremony was held in Chandrapur in a truth-seeking manner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.