शिवाजी महाविद्यालयास विद्यापीठस्तरीय पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:28 AM2021-08-15T04:28:39+5:302021-08-15T04:28:39+5:30
सोबतच राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला गौरव प्राप्त झाला आहे. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्यावतीने ...
सोबतच राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला गौरव प्राप्त झाला आहे. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्यावतीने विद्यापीठस्तरीय सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी पुरस्कार, सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार २०२०-२१सुद्धा जाहीर झालेला आहे. प्रा. गुरुदास बलकी यांची श्री शिवाजी महाविद्यालयात नियुक्ती २०१६ मध्ये इतिहास विषयासाठी सहायक प्राध्यापक म्हणून झालेली आहे. प्रा. बलकी हे राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे कार्यक्रम अधिकारी म्हणून २०१८ पासून कार्यरत आहेत. मागील तीन वर्षातील म्हणजेच २०१८-१९,२०१९-२०, २०२०-२१ या कालावधीमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांसाठी सामाजिक जाणीव व राष्ट्रभक्ती जोपासणारे अनेक उपक्रम घेतले. त्यामध्ये जलसंवर्धनासाठी जलव्यवस्थापन, जलपुनर्भरण, वनराई बंधारे, मतदान व मतदार जनजागृतीसाठी पथनाट्ये, जनजागृती रॅली, सिंगल युझ प्लास्टिक फ्री इंडियासाठी जनजागृती, तसेच एचआयव्ही एड्स जनजागृती उपक्रमाअंतर्गत जनजागृती रॅलीचे आयोजन, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, पर्यावरण संवर्धनासाठी उपक्रम, सायबर क्राईम जनजागृती कार्यशाळा, तंबाखूमुक्ती तसेच नियंत्रणासाठी जनजागृती असे अनेक कार्यक्रम घेतले.