विद्यापीठाने परीक्षा शुल्क कमी करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:29 AM2021-05-20T04:29:59+5:302021-05-20T04:29:59+5:30

राजुरा : सध्या संपूर्ण देशात कोविड-१९ या महामारीने बिकट परिस्थिती निर्माण केलेली आहे. अनेकांना आपल्या रोजगार, ...

The university should reduce the examination fees | विद्यापीठाने परीक्षा शुल्क कमी करावे

विद्यापीठाने परीक्षा शुल्क कमी करावे

Next

राजुरा : सध्या संपूर्ण देशात कोविड-१९ या महामारीने बिकट परिस्थिती निर्माण केलेली आहे. अनेकांना आपल्या रोजगार, व्यवसायाला मुकावे लागले आहे. हातचा रोजगार गेल्याने जीवन जगण्याचे मोठे संकट समोर उभे असतानाच आपल्या पाल्यांना उच्च शिक्षित करण्याचे स्वप्न बघणाऱ्या पालकवर्गापुढे विद्यापीठाच्या शैक्षणिक शुल्काचेही संकट उभे ठाकले आहे.

पालकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

गोंडवाना विद्यापीठाची पार्श्वभूमी ही आर्थिक, सामाजिक घटकांची प्रगती करत त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता झाली असून, या परिस्थितीत परीक्षा शुल्क कमी करून विद्यार्थी वर्गाला आधार देण्याची मागणी बिइंग डिझायर बहुउद्देशीय संस्थेने राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व विद्यापीठाला वारंवार केली आहे. गोंडवाना विद्यापीठाने योग्य निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना आधार देत परीक्षा शुल्क कमी करावे, अशी विनंती अक्षय डाकरे, दत्ता पुरोहित, अंशुल चामलवार, निखिल पटकोटवार, प्रथमेश दानव, गजू नागपुरे, रोशन नगराळे यांनी केली आहे.

Web Title: The university should reduce the examination fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.