जिल्ह्यात रक्ताचा अभूतपूर्व तुडवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:30 AM2021-08-26T04:30:47+5:302021-08-26T04:30:47+5:30

मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे रक्तदात्यांची संख्या घटली. मध्यंतरी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत विविध ठिकाणी शिबिरे आयोजित केली होती. त्यामुळे ...

Unprecedented bloodshed in the district | जिल्ह्यात रक्ताचा अभूतपूर्व तुडवडा

जिल्ह्यात रक्ताचा अभूतपूर्व तुडवडा

Next

मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे रक्तदात्यांची संख्या घटली. मध्यंतरी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत विविध ठिकाणी शिबिरे आयोजित केली होती. त्यामुळे काही प्रमाणात रक्तसाठा जमा झाला होता. आता जिल्ह्यात डेंग्यू आजाराचे रुग्ण वाढले असून, त्यांच्यासह इतर आजारी रुग्णांना रक्त द्यावे लागत आहे. साठा कमी आणि मागणी वाढल्यामुळे सद्य:स्थितीत जिल्ह्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुडवडा आहे. काही रक्तदाते शासकीय रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करीत आहेत. मात्र, दररोजची मागणी जास्त असल्याने तेही कमी पडत आहे. त्यामुळे सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, तसेच शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदान करणे अत्यावश्यक आहे.

बाॅक्स

शिल्लक रक्ताचा साठा

सद्य:स्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रक्तपिशव्यांचा अगदीच अल्प साठा आहे. यामध्ये ए ग्रुपची एकही पिशवी शिल्लक नाही. बीच्या ४ ते ५ बाटल्या, तर ओ रक्तग्रुपच्या केवळ १० बाटल्या उपलब्ध आहेत. त्यामुळे मागणी केल्यास रक्त कुठून आणायचे, असा बिकट प्रश्न सध्या येथील शासकीय रक्तपेढीतील अधिकाऱ्यांना पडला आहे.

बाॅक्स

‘लोकमत’ने आयोजित केलेल्या

शिबिरांमुळे आधार

कोरोना संकटामुळे राज्यात रक्ताचा तुडवडा होता. ही बाब लक्षात घेता ‘लोकमत’ने संपूर्ण राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. चंद्रपूर जिल्ह्यातही गावागावांत रक्तदान शिबिर आयोजित केले. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रक्तसाठा जमा झाला होता. मात्र, आता मागणी वाढल्यामुळे पुन्हा रक्त तुडवडा जाणवत आहे.

बाॅक्स

मागील काही दिवसांत रक्ताची मागणी वाढली आहे. त्या तुलनेत रक्तदात्यांची संख्या घटल्यामुळे तुडवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावे. यामुळे रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाइकांना दिलासा मिळेल.

-डाॅ. अनंत हजारे

जिल्हा रक्तसंक्रमण अधिकारी, चंद्रपूर

Web Title: Unprecedented bloodshed in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.