बांबूच्या साहित्याची विक्री करून साधली कुटुंबाची उन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:33 AM2021-08-17T04:33:21+5:302021-08-17T04:33:21+5:30
विकास शेडमाके देवाडा बुज (जुनगाव) : कोरोना कालावधीत आदिवासी कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हतबल झाली असून, ते बेहाल झाले ...
विकास शेडमाके
देवाडा बुज (जुनगाव) : कोरोना कालावधीत आदिवासी कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हतबल झाली असून, ते बेहाल झाले होते. अशा गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी एका आदिवासी नागरिकाने तरगाव खेड्यातील बांबू आणून बांबूपासून अनेक साहित्य बनविण्याची कला अवगत केली. याच साहित्याची विक्री करून त्यांनी आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती साधली आहे.
या आदिवासी कारागिराचे नाव आहे तुळशीराम पत्रू मेश्राम. ते पोंभुर्णा तालुक्यातील अवघड क्षेत्रांतर्गत येत असलेल्या देवाडा बुज येथील मूळ रहिवासी. निरक्षर असतानादेखील घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करण्यासाठी कलेच्या भरोशावर बांबूपासून सूप, टोपली, ताटवे, बेंदवे इत्यादी साहित्य बनवून त्याची विक्री करीत आहे. दीडशे ते दोनशे रुपये एका वस्तूच्या विक्रीतून त्यांना मिळतो. यातून ते कुटुंबाचा प्रपंच चालवित आहेत.
160821\img_20210815_100643.jpg
बांबु पासुन साहित्या बनविणे फोटो