उरात दु:ख साठवून आनंदवन येतोय पुर्वपदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:55 AM2020-12-04T04:55:42+5:302020-12-04T04:55:42+5:30
प्रवीण खिरटकर वराेरा(चंद्रपूर) : कर्मयाेगी बाबा व साधनाताईंची लाडकी नात डाॅ. शितल आमटे करजगी यांच्या निधनानंतर दुखाच्या सावटात ...
प्रवीण खिरटकर
वराेरा(चंद्रपूर) : कर्मयाेगी बाबा व साधनाताईंची लाडकी नात डाॅ. शितल आमटे करजगी यांच्या निधनानंतर दुखाच्या सावटात हरविलेले आनंदवन हळूहळू पुर्वपदावर येत आहे. डाॅ. शीतलच्या निधनाने दु:ख उरात भिडवून आता आनंदवनातील प्रत्येक घटक आपल्या कामात मग्न होत असल्याने चित्र बुधवारी आनंदवनात पहायला मिळाले.
कर्मयोगी बाबांनी श्रमही श्रीराम हे हमारा असे म्हणते मोजक्या कुष्ठरोग्यांना सोबत घेऊन श्रमाने आनंदवन उभे केले. आनंदवनात असणारे कुष्ठराेगी, अंध, अपंग आदी घटकातील व्यक्तींनी स्वत:च्या पायावर उभे राहले पाहिजे. आनंदवनात हातमाग, तीनचाकी सायकल, तयार करणे, रूग्णालय, वेल्डिंग वर्कशाप, दस्तकला, शिवणकला आदी प्रकल्प उभारले आहे. यासर्व प्रकल्पामध्ये शेकडो आनंदवनातील व्यक्ती काम करीत आहे. कर्मयोगी बाबा व साधनाताईंच्या कार्याचा वसा तिसऱ्या पिढीतील डाॅ. शितल आमटे करजगी यांनी काही वर्षांपासून आपल्या हाती घेवून नव्या जोमाने कामाला सुरूवात केली. डाॅ. शीतल यांच्या मृत्यूनंतर आनंदवनात स्मशान शांतता पसरली होती. सारे काही संपले आहे. असे एकंदर वातावरण तयार झाले होते. परंतु कर्मयोगी बाबा आमटे यांची शिकवण आचरणात आणत आनंदवनचा परिवार आपले दु:ख उरात साठवून कामाला लागत आहे.