भद्रावती नगर परिषदेतर्फे नगरविकास दिन साजरा
By Admin | Published: April 23, 2017 01:12 AM2017-04-23T01:12:36+5:302017-04-23T01:12:36+5:30
भद्रावती नगर परिषदेतर्फे शुक्रवारी प्रथम नगर विकास दिन साजरा करण्यात आला. नगर विकास दिनाच्या
निबंध स्पर्धा : शिबिराचा १०० जणांना लाभ
भद्रावती : भद्रावती नगर परिषदेतर्फे शुक्रवारी प्रथम नगर विकास दिन साजरा करण्यात आला. नगर विकास दिनाच्या निमित्ताने २० एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. प्रथम नगर विकास दिनाचे उद्घाटक म्हणून प्रा. सचिन सरपटवार उपस्थित होते. तसेच न.प. मुख्याधिकारी विनोद जाधव व डॉ. कुंभारे आदी उपस्थित होते. याप्रसंगी सफाई कर्मचारी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. जवळपास १०० सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली.
याप्रसंगी मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी नगर विकास दिनाचे महत्त्व सांगून ३० एप्रिलपर्यंत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी प्रा. सरपटवार यांनीही मार्गदर्शन केले. तसेच आपले शहर कसे असावे, या विषयावर दोन गटात न.प. भद्रावतीतर्फे निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रथम गट इयत्ता ५ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी आहे. प्रथम बक्षीस ४ हजार रुपये, द्वितीय २ हजार रुपये व तृतीय बक्षीस १ हजार रुपये तसेच प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. द्वितीय गटात खुली स्पर्धा असणार असून प्रथम बक्षीस ५ हजार रुपये, द्वितीय ३ हजार रुपये व तृतीय बक्षीस २ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र राहणार आहे. इच्छूक स्पर्धकांनी आपले शहर कसे असावे, या विषयावर हस्ताक्षरात किंवा संगणकीकृत प्रतीमध्ये कमीत कमी ५०० शब्द निबंध लिहून २६ पर्यंत मोनिका डोके, न.प. भद्रावती यांच्याकडे जमा कराव्या, असे आवाहन मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)