शिक्षक पॉझिटिव्ह असताना विद्यार्थ्याना शाळेत बोलविण्याचा हट्टहास कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:42 AM2020-12-16T04:42:01+5:302020-12-16T04:42:01+5:30
शासनाने ९ वी ते १२ वी पर्यंतचा विद्यार्थ्यांना पालकांची सहमती घेवून शाळेत बोलविणे सुरू केले आहे. परंतु, कोरोना विषाणूची ...
शासनाने ९ वी ते १२ वी पर्यंतचा विद्यार्थ्यांना पालकांची सहमती घेवून शाळेत बोलविणे सुरू केले आहे. परंतु, कोरोना विषाणूची भिती कायम असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती नगन्य आहे. शाळा निर्जंतुकीकरण करणे विशीष्ट अंतरावर विद्यार्थी बसविणे, मास्क घालूनच शाळेत बसणे आदी नियम शासनाने ठरवून दिले आहे. तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. यामध्ये कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यास शाळा सात दिवस बंद ठेवण्याचे स्पष्ट आदेश आहेत. मातम वरोरा शहरातील एका शाळेतील दोन शिक्षक ११ डिसेंबर रोजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल शाळा प्रशासनास प्राप्त झाला. मात्र असे असतानाही शाळा बंद ठेवण्यात आली नाही. शाळेत शिक्षक व विद्यार्थ्यांना बोलविण्यात येत आहे. मात्र त्यामुळे शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना कोरानाची लागण झाल्यास ती झपाट्याने समाजात पसरण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
कोट
शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्यास शाळा सात दिवस बंद ठेवण्याचे आदेश आहेत. या आदेशाची अवहेलना केल्या गेली असेल तर शाळावर कार्यवाही करण्यात येईल.
- टी. एम. कुचनकर
गटशिक्षणाधिकारी
पं. स. वरोरा