शिकारीसाठी विद्युत तारांचा वापर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 06:00 AM2020-02-14T06:00:00+5:302020-02-14T06:00:40+5:30

अगदी महिनाभराच्या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीत वीज तारांचा वापर करून एका वाघाची शिकार करण्यात आली. स्थानिक शिकारी अथवा शिकारी टोळ्या जंगलातून जाणाºया उच्च दाब वीज वाहिन्यांचा वापर करून तारांचे जाळे पसरवत छोटया जनावरांना लक्ष्य करीत असतात. मात्र, या तारांच्या संपर्कात वाघ-बिबटे-अस्वल यासारखे संरक्षित प्राणीदेखील येण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या महिन्यात ब्रह्मपुरी येथे अशाच प्रकारे वाघाची शिकार उघडकीस आली होती.

The use of electric wires for hunters increased | शिकारीसाठी विद्युत तारांचा वापर वाढला

शिकारीसाठी विद्युत तारांचा वापर वाढला

Next
ठळक मुद्देवनविभाग गंभीर : कारवाईसाठी दोनशे कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात प्रवाही विद्युत तारांचा शिकारीसाठी वापर होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. चंद्रपूर जिल्हा जंगलाचा जिल्हा आहे. वाघ, बिबट यांच्यासह शेकडो जातीचे वन्यप्राणी चंद्रपूर जिल्ह्यात आहे. या वनक्षेत्रातील गावांमध्ये शिकारी टोळी अथवा स्थानिक असामाजिक तत्वांच्या माध्यमातून जिवंत वीज तारांचा वापर करुन वन्यजीवांच्या शिकारीचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. या शिकारीच्या जाळात अडकून आता वाघ, बिबट आणि मोठी जनावरेदेखील मृत्युमुखी पडत आहेत. याबाबत वनविभाग आता गंभीर झाले आहे. सदर प्रकार टाळण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेत दोनशे कर्मचाऱ्यांना या संदर्भात प्रशिक्षण दिले आहे.
अगदी महिनाभराच्या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीत वीज तारांचा वापर करून एका वाघाची शिकार करण्यात आली. स्थानिक शिकारी अथवा शिकारी टोळ्या जंगलातून जाणाऱ्या उच्च दाब वीज वाहिन्यांचा वापर करून तारांचे जाळे पसरवत छोटया जनावरांना लक्ष्य करीत असतात. मात्र, या तारांच्या संपर्कात वाघ-बिबटे-अस्वल यासारखे संरक्षित प्राणीदेखील येण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या महिन्यात ब्रह्मपुरी येथे अशाच प्रकारे वाघाची शिकार उघडकीस आली होती.
भद्रावती तालुक्यातील केंद्रीय आयुध निर्माणीच्या जंगलात बिबट आणि अस्वलाच्या जोडयांनादेखील प्राण गमवावा लागला होता. वनविभागाने या घटना गांभीर्याने घेतल्या आहेत. वनविभागाचे अधिकारी, वीज वितरण कंपनीचे अधिकारी-कर्मचारी याखेरीज वीज केंद्र आणि आयुध निर्माणी यांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची एक संयुक्त कार्यशाळा चंद्रपुरात पार पडली. कार्यशाळेत सुमारे दोनशे वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले. जंगल भागात शिकार रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांना नेमके प्रशिक्षण आणि घटनांच्या नोंदी ठेवण्यासोबतच छोटयात छोटी अनुचित घटनादेखील समन्वय अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. चंद्रपूर मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांनी विविध सूचना दिल्या. यासोबतच डब्ल्युपीएसआय, नागपूरचे संचालक नितीन देसाई, उदय पटेल, बंडू धोतरे, महवितरणचे अभियंता देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.

पायदळ गस्त आवश्यक
आपल्या शेताच्या आसपास फिरणाऱ्या आणि पिकांचे नुकसान करणाऱ्या वन्यजीवांना मारण्याकडे शेतकºयांचा कल असतो. याशिवाय दहशत पसरवणारे वाघ-बिबटे-अस्वल देखील स्थानिक शेतकऱ्यांचे शत्रू ठरतात. यामुळेच पीक वाचवण्यासाठी सौर कुंपणाच्या योजनांची अंमलबजावणी आणि पायदळ प्रत्यक्ष गस्त आवश्यक असल्याचे मत वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. आगामी काळात जंगल भागातून असलेल्या वीज वाहिन्यांच्या बिघाडाची माहिती वनविभागाच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती ठरणार आहे. त्यामुळेच या भागात अधिक समन्वय राखणे काळाची गरज बनली आहे, असे मत चंद्रपूरचे मानद वन्यजीवरक्षक बंडू धोतरे यांनी व्यक्त केले.

Web Title: The use of electric wires for hunters increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.