राष्ट्रीय महामार्गनिर्मितीत फ्लाय अॅशचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 11:02 PM2018-05-18T23:02:46+5:302018-05-18T23:03:00+5:30
राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई या महामार्गाचे चिमूर ते वरोरापर्यंत बांधकाम सुरु आहे. मात्र सदर बांधकाम संथ गतीने सुरु आहे. तसेच या बांधकामात फ्लाय अॅशचा वापर केला जात असल्याने कामाचा दर्जा खालाविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई या महामार्गाचे चिमूर ते वरोरापर्यंत बांधकाम सुरु आहे. मात्र सदर बांधकाम संथ गतीने सुरु आहे. तसेच या बांधकामात फ्लाय अॅशचा वापर केला जात असल्याने कामाचा दर्जा खालाविला आहे. त्यामुळे सदर कंत्राटी कंपनीवर कारवाई करून रोडचे काम नियोजित कालावधीत पूर्ण करावे, या मागणीचे निवेदन छात्र युवा संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष अक्षय बोंदगुलवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.
मागील काही महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्ग नंबर ३५३ चे काम चिमूर वरोरा मार्गाने सुरु आहे. मात्र कुठलेही बांधकामाबाबत कोणतेही दिशादर्शक फलक लावण्यात आले नाही. तसेच बांधकाम अत्यंत संथगतीने सुरु असून या बांधकामात फ्लाय अॅशचा वापर मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
फ्लाय अॅश टाकण्यात येत असल्यामुळे या रस्त्यावरुन मोठे वाहन गेल्यास मोठ्या प्रमाणात धुळ निघत असल्याने वाहनचालकाला समोरचे काहीच दिसत नाही. परिणामी या मार्गावर बरेच अपघात घडले आहे. त्यामुळे सदर रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करुन कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी, व कामाचा दर्जा सुधारावा, अशी मागणी अक्षय बोंदगुलवार यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.