सकारात्मक सोशल मीडियाच्या वापरासाठी महामित्रचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 11:26 PM2018-02-07T23:26:20+5:302018-02-07T23:26:41+5:30

महाराष्ट्र शासनाच्या महामित्र अ‍ॅप डाऊनलोड करण्याच्या उपक्रमाला चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.

Use of Mahamitra for the use of positive social media | सकारात्मक सोशल मीडियाच्या वापरासाठी महामित्रचा प्रयोग

सकारात्मक सोशल मीडियाच्या वापरासाठी महामित्रचा प्रयोग

Next
ठळक मुद्देएस. व्ही. माधमशेट्टीवार : चंद्रपुरात सोशल मीडिया महामित्र उपक्रम

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाच्या महामित्र अ‍ॅप डाऊनलोड करण्याच्या उपक्रमाला चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी महाविद्यालयाचे अध्यक्ष तथा उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.माधमशेट्टीवार यांनी सकारात्मक सोशल मिडीयाच्या वापरासाठी महामित्रचा प्रयोग महत्वपूर्ण असून यासाठी विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
राज्य शासनातर्फे आधुनिक युगातील वेगवान संपर्क साधनांचा विधायक कायार्साठी उपयोग करुन घेण्यासाठी आणि तरुणांना जास्तीत जास्त संधी देवून विवेकशील समाज घडविण्यासाठी ‘सोशल मीडिया महामित्र उपक्रम’ राबविण्याचा निर्धार केला आहे. या अंतर्गत १ ते १८ फेब्रुवारीपर्यंत महामित्र अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी तरुणांना आवाहन करण्यात येत आहे. सरदार पटेल महाविद्यालयामध्ये मंगळवारी जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, अनुलोम संस्थेचे जिल्हासमन्वय ऋषीकेश देशपांडे, संगणक विभाग प्रमुख एस.बी.किशोर, वाणिज्य विभाग प्रमुख आर.के.सावलीकर, राहूल ताकधर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना उपप्राचार्य माधमशेट्टीवार म्हणाले, देशातील बहुतांश युवक फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, इन्स्टाग्राम, ट्विटर आदींचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. अनेक विषय पुस्तकांमधून वाचण्याऐवजी मोबाईलवर वाचन करण्याची सवय विद्यार्थ्यांना होत आहे. हळहळू हा मीडिया अधिक सशक्त होत आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आता या माध्यमाला अभ्यासाचे माध्यम बनवले आहे. त्यामुळे शासनाने सोशल मीडियाची ताकद जाणून ‘सोशल मीडिया महामित्र’ उपक्रम राबविण्याचा ठरविले आहे.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी सोशल मिडियाचा सकारात्मक वापर करणाºया तरुणांनी समाजाच्या प्रवाहात येवून या अ‍ॅपच्या माध्यमातून सकारात्मक संवाद व्यवस्थेचे घटक होण्याचे आवाहन केले. ऋषीकेश देशपांडे यांनी यावेळी महामित्र अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. तसेच यामध्ये पूर्ण तपशील भरुन १८ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन केले. सदर अ‍ॅप डाऊनलोड करणाºयांपैकी प्रत्येक तालुक्यातून १० युवकांची सोशल मीडिया महामित्र म्हणून निवड करुन त्यांना मुख्यमंत्र्यांतर्फे सन्मानीत करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Web Title: Use of Mahamitra for the use of positive social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.