उद्योगांचा सामाजिक दायित्व निधी आरोग्य सेवेसाठी वापरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:30 AM2021-04-28T04:30:19+5:302021-04-28T04:30:19+5:30
राजुरा उपविभागात मोठ्या रुग्णालय इमारती, विविध कारखान्यांची इस्पितळे व मोठी खुली मैदाने आहे. तसेच येथे मोठे सिमेंट कारखाने, वेकोलीसारखे ...
राजुरा उपविभागात मोठ्या रुग्णालय इमारती, विविध कारखान्यांची इस्पितळे व मोठी खुली मैदाने आहे. तसेच येथे मोठे सिमेंट कारखाने, वेकोलीसारखे मोठे उद्योग प्रस्थापित आहे. या कारखान्यांचा सामाजिक दायित्व निधी ही मोठ्या प्रमाणात आहे. या निधीचा योग्य उपयोग केल्यास तयार इमारतीत कोविडचे सुसज्ज हॉस्पिटल निर्माण होऊ शकते. तसेच खुल्या मैदानाचा वापर करावयाचे झाल्यास नागपूरच्या धर्तीवर राजुरा येथे ही भव्य शेड निर्माण करून कोविड रुग्णालय निर्माण करता येऊ शकते. यामुळे जिवती, कोरपना, गडचांदूर व राजुरा तालुक्यातील रुग्णांना राजुरा येथे उपचार घेणे सोयीचे होणार असल्याचे निवेदन म्हटले आहे. निवेदनाची प्रत आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, माजी आमदार ॲड. संजय धोटे व उपविभागीय अधिकारी यांना पाठविण्यात आली आहे.