वायगावच्या हळदीचा कर्करोगावरील औषधांमध्ये वापर

By admin | Published: March 31, 2017 12:44 AM2017-03-31T00:44:59+5:302017-03-31T00:44:59+5:30

गत अनेक वर्षांपासून वायगाव (तु.) येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पन्न घेत आहेत.

Use of Vaude syrup medicines in vogue | वायगावच्या हळदीचा कर्करोगावरील औषधांमध्ये वापर

वायगावच्या हळदीचा कर्करोगावरील औषधांमध्ये वापर

Next

कृषी विद्यापीठाकडून संशोधन : हळदीला मिळाले नवे नाव
वरोरा : गत अनेक वर्षांपासून वायगाव (तु.) येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पन्न घेत आहेत. परंतु, हळदीला बाजारपेठ उपलब्ध नसल्याने हळद उत्पादक शेतकरी हवालदिल होते. परंतु डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी या हळदीची पाहणी करून संशोधन केले असता, हळदीमध्ये ६ टक्केपेक्षा अधिक कुरक्मींग असल्याने कर्करोग आजारावर देण्यात येणाऱ्या औषधामध्ये येथील हळद उपयुक्त असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे वायगाव येथील हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण दिसू लागला आहे.
वायगाव (तु.) या गावाची लोकसंख्या दोन हजार आहे. या गावात मागील काही वर्षांपासून हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. आजही गावात १०० हेक्टर पेक्षा अधिक जमिनीत हळदीचे उत्पादन घेतले जाते. हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असताना जवळपास मात्र बाजारपेठ उपलब्ध नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी हळदीच्या पिकाकडे पाठ फिरविली. हळद यासोबतच जमिनीमध्ये अद्रक व कांदा, लसून या पिकांचेही डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे संशोधक वायगाव येथे येवून पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. (तालुका प्रतिनिधी)

हळदीमध्ये दोन गुणधर्म
वायगाव (तु.) येथील हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात सुगंध असल्याने सौंदर्य प्रसाधन साहित्यामध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो. तसेच हळदीमध्ये ६ टक्क्यापेक्षा अधिक कुरक्मींग असल्याने कर्करोग प्रतिबंध करणाऱ्या औषधामध्ये त्याचा उपयोग होत असल्याने वायगाव (तु.) येथील हळदीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
हळदीला पीडीकेव्ही वायगाव असे नाव
वायगाव (तु.) येथील हळदीबाबत आजपर्यंत संशोधन झाले नाही. नुकतेच डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाच्या संशोधकांनी वायगाव (तु.) येथील हळदीचे गुणधर्म तपासले आहे. त्यात सुगंध, कुरक्मींग व अधिकचा पिवळा रंग आहे. त्यामुळे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाने हळदीला पीडीकेव्ही वायगाव असे नाव दिले आहे.

वायगाग (तु.) येथील हळद अतिशय दर्जेदार असल्याने संशोधनातून सिद्ध झाले. पीडीकेव्ही वायगाव असे नाव हळदीला मिळाल्याने व्हेरायटीचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सबसीडी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
- डॉ.विजय काळे, विभाग प्रमुख
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
मागील कित्येक वर्षांपासून वायगाव (तु.) येथील शेतकरी हळदीचे उत्पन्न घेत आहेत. परंतु हळदीला बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. त्यामुळे हळदीची बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी.
- मंगेश कुरेकार, वायगाव (तु.)

Web Title: Use of Vaude syrup medicines in vogue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.