मोकळा प्लॉट सांभाळणे झाले कठीण; चंद्रपुरात वाढतेय अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:20 AM2021-06-20T04:20:00+5:302021-06-20T04:20:00+5:30
गुंतवणूक म्हणून अनेकजण प्लॉट खरेदी करतात. बरेच वर्ष त्यावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करीत नाही. बहुतेकजण तर सभोवताल संरक्षण भिंतीचेही ...
गुंतवणूक म्हणून अनेकजण प्लॉट खरेदी करतात. बरेच वर्ष त्यावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करीत नाही. बहुतेकजण तर सभोवताल संरक्षण भिंतीचेही बांधकाम करीत नाही. तसेच परगावी राहत असल्याने त्या प्लॉटकडे जातही नाही. याचाच फायदा घेत शेजारील व्यक्ती त्यावर अतिक्रमण करीत असल्याचे प्रमाण वाढले आहेत. एनए असलेला प्लाॅट असल्यास त्यासंदर्भात कारवाई करून न्याय मिळण्याची शक्यता असते. मात्र अनधिकृतरित्या लेआऊट पाडले असल्यास त्यातून न्याय मिळण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे प्लॉट खरेदी केल्यानंतर मालकांनी विशेष काळजी बाळगणे गरजेचे आहे.
बॉक्स
प्लाॅट असल्यास ही घ्या काळजी
प्लॉटची खरेदी झाल्यानंतर तत्काळ त्यास सिमेंटचे खंबे गाडून तार कुंपन करून घ्यावे किंवा सुरक्षा भिंतीचे बांधकाम करावे. प्लॉट खरेदी केल्यानंतर लगेच रजिस्टी करावी. तसेच प्लॉटच्या चारही बाजूंनी ठळक अक्षरात मूळ मालकाचे नाव आणि प्लॉटवर कुणीही अतिक्रम करू नये, असा मजकूर नमूद असलेला फलक लावल्यास चुकीच्या प्रकारांना बहुतांशी आळा बसू शकतो. प्लॉट मालक दुसऱ्या ठिकाणी राहत असल्यास अधून-मधून प्लॉटची पाहणी करावी.
------
बॉक्स
एकच प्लॉट अनेकांना विकला
चंद्रपूर शहरातील काही भागात एकच प्लॉट एकापेक्षा अधिक लोकांना विकल्याचा प्रकार यापूर्वी घडलेला आहे. असे प्रकार टाळण्यासाठी प्लॉट खरेदी करताना मूळ मालकांकडील कागदपत्रे तपासून संबंधित कार्यालयातून त्याची खातरजमा करणे गरजेचे आहे. नाहीतर फसवणुकीला आपणसुद्धा बळी पडू शकतो.
--------
बॉक्स
अनधिकृत प्लॉट असल्यास सावधान
बहुतेकजण प्लॉट खरेदी करताना पैसे बचत करण्याच्या अनुषंगाने अनधिकृत प्लॉट खरेदी करतात. त्यामध्ये मूळ मालक स्वत:च जमिनीचे तुकडे करुन लेआऊट टाकतो. मात्र कुठलीही अधिकृत परवानगी नसते. केवळ सातबाऱ्यावर असतात. मात्र त्याचा नकाशा नसतो. एखाद्याने किती जमीन खरेदी केली. त्याचा अधिकृत पुरावा नसतो. अशा प्लॉटवर एखाद्याने अतिक्रमण केल्यास न्यायालयातूनही न्याय मिळणे कठीण होते.