व्यापारी दुकानात काम करणाऱ्या सर्वांना लस द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:20 AM2021-06-03T04:20:50+5:302021-06-03T04:20:50+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. काही दिवसात अनलॉक होण्याची शक्यता असल्याने व्यापारी प्रतिष्ठाने उघडायला सुरुवात होईल. ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. काही दिवसात अनलॉक होण्याची शक्यता असल्याने व्यापारी प्रतिष्ठाने उघडायला सुरुवात होईल. प्रतिष्ठान सुरू झाल्यानंतर गर्दी वाढण्याची शक्यता असून या दुकानांमधून मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे व्यापारी व सर्व दुकानांमध्ये काम करणाऱ्या लहान मोठ्यांना कोरोना लसीचा डोस देणे गरजेचे आहे. लस दिल्यास दुकानात येणाऱ्या कोणत्याही ग्राहकाला संसर्ग होण्याची भीती राहणार नाही. सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण सुरू आहे. १८ वर्षांवर असलेल्यांचे लसीकरण होणार आहे. त्यामुळे गर्दी वाढण्याची शक्यता आहे. यासाठी दुकानातील सर्वांना विशेष वेळ ठरवून लस दिल्यास सोईचे होईल. ऑनलाईन नोंदणी करताना पण मर्यादित नोंदणी सारख्या अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे व्यापारी तसेच दुकानांतील कर्मचाऱ्यांना विशेष कॅम्प घेऊन लवकरात लवकर वयाचे बंधन न ठेवता लसीकरण करणे महत्त्वाचे वाटते, असे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. आ. मुनगंटीवार यांनी लगेच दूरध्वनीवरून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क करून सदर मागणी केली असून लवकरच या बाबतीत सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. यावेळी पंचायत समिती मूलचे सभापती चंदू मारगोनवार, नगरपरिषद मूलचे उपाध्यक्ष नंदू रणदिवे, न. प. बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, ओबीसीचे पदाधिकारी राकेश ठाकरे आदी उपस्थित होते.