राज्य परिवहन चंद्रपूर विभागात लसीकरण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:27 AM2021-07-31T04:27:47+5:302021-07-31T04:27:47+5:30
चंद्रपूर : राज्य परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याच्या अनुषंगाने विभाग नियंत्रक स्मिता सुतवणे, विभागीय वाहतूक अधिकारी रंजू घोडमारे यांच्या ...
चंद्रपूर : राज्य परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याच्या अनुषंगाने विभाग नियंत्रक स्मिता सुतवणे, विभागीय वाहतूक अधिकारी रंजू घोडमारे यांच्या पुढाकाराने चंद्रपूर विभागातील प्रशिक्षण केंद्र, तसेच राजुरा, वरोरा, चिमूर आगारात लसीकरण शिबिर राबविण्यात आले. यावेळी अनेकांनी लसीकरण केले.
कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. राज्य परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांना लसीकरणाचा लाभ घेता यावा, या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांना आगार स्तरावर शिबिर घेण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने गुरुवार व शुक्रवारी रा. प. प्रशिक्षण केंद्र विभागीय कार्यालय चंद्रपूर, राजुरा, चिमूर, वरोरा आगारात शिबिर राबविण्यात आले. शिबिराच्या आयोजनासाठी जिल्हा लसीकरण अधिकारी संदीप गेडाम, आरोग्य अधिकारी खंडाळे, डॉ. उत्तरवार, डॉ. देवयानी, स्टॉफ नर्स सरिता लोखंडे, वैशाली दडमल, इशा गेडाम, प्रणाेती पडगेलवार, विद्या गराटे, श्रीयंका घोनमोडे आदींंनी कामगिरी बजावली. यशस्वीतेसाठी विभाग नियंत्रक स्मिता सुतवणे, विभागीय वाहतूक अधिकारी रंजू घोडमारे, कामगार अधिकारी राकेश तलमले, भांडार अधिकारी विपीण जोग, अविनाश वासेकर, राणे, मोडक आदींनी प्रयत्न केले.
300721\30cpr_4_30072021_32.jpg
फोटो : शिबिराला उपस्थित विभाग नियंत्रक स्मिता सुतवणे, विभागीय वाहतूक अधिकारी रंजू घोडमारे