कृषी कन्येने राबविली लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:31 AM2021-08-12T04:31:37+5:302021-08-12T04:31:37+5:30
टेमुर्डा : मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी अमृता गुजरकर हिने ग्रामीण व कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत वरोरा तालुक्यातील जामनी गावात ...
टेमुर्डा : मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी अमृता गुजरकर हिने ग्रामीण व कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत वरोरा तालुक्यातील जामनी गावात ‘ जनावरांची काळजी’ या विषयावर लसीकरण मोहीम राबविली, तसेच मार्गदर्शन केले.
जनावरांना आजार झाल्यास अपुऱ्या पशुवैद्यकीय सेवेमुळे किंवा निदान न झाल्यामुळे जनावरे दगावतात . पशुपालकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. त्यामुळे जनावरांना रोगांपासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण करणे अतिशय आवश्यक ठरते. जनावरांना नियमित लसीकरण केल्यास संसर्गजन्य आजाराचे प्रमाण कमी होऊन जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकते, असे अमृताने शेतकऱ्यांना सांगितले. आजनगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल तुर्के यांच्या मार्गदर्शनात लसीकरण करण्यात आले. यावेळी विविध रोगाबद्दल माहिती देण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ठाकरे, उपप्राचार्य कडू, प्रा. सराफ, प्राध्यापिका एस. पी. लोखंडे उपस्थित होते.