लस घेतल्याने सबसिडी बंद होते न गा भाऊ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:19 AM2021-06-23T04:19:31+5:302021-06-23T04:19:31+5:30

कोरोना लसीवरून बरेच संभ्रम आजही नागरिकांत आहे. शासनाच्या व्यापक जनजागृतीनंतरही अनेक सुज्ञ नागरिकसुद्धा लस घेण्यासाठी भीती पोटीपुढे येत नाहीत. ...

Vaccination stops subsidy, brother! | लस घेतल्याने सबसिडी बंद होते न गा भाऊ !

लस घेतल्याने सबसिडी बंद होते न गा भाऊ !

Next

कोरोना लसीवरून बरेच संभ्रम आजही नागरिकांत आहे. शासनाच्या व्यापक जनजागृतीनंतरही अनेक सुज्ञ नागरिकसुद्धा लस घेण्यासाठी भीती पोटीपुढे येत नाहीत. त्यात निरक्षर व्यक्तींना सांगणे तर एक प्रकारचे अग्निदिव्यच आहे. लसीवरून अनेक समज, गैरसमजुतीच्या चर्चा समाजमंथनात ऐकावयास मिळतात. अशीच चर्चा कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागातील अशिक्षित कुटुंब खासगी चारचाकीतून कौटुंबिक कार्यक्रमासाठी जाताना सुरू होती. लस घ्यावी की नाही यावर गाडीतील प्रत्येकजण आपले मत मांडत असताना त्यातील एकाने लस घेतल्याने शासनाच्या सबसिडी, सोयी-सवलती बंद होतात, असे सांगितले. गाडीतील सर्वजण निरक्षर असल्याने त्यांनी पण हा समज खरं कां? असं होते कां? गा, भाऊ ! म्हणून ग्राह्य धरला. मात्र लागलीच थोडेसे स्मितहास्य करून वाहनाचा चालक सुशिक्षित असल्याने त्याने त्यांना समजावून सांगत कोरोना लस कशी उपयुक्त आहे, हे पटवून दिले आणि त्यांचा लसीविषयीचा गैरसमज दूर झाला.

Web Title: Vaccination stops subsidy, brother!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.