वैराग्यमूर्ती गाडगे महाराजांचे विचार घराघरांत पोहोचावे- सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2023 12:14 PM2023-02-25T12:14:37+5:302023-02-25T12:14:47+5:30

चंद्रपूर : समाजाला घडविण्याचे महत्तम कार्य वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराजांनी केले आहे. त्यामुळे त्यांचे विचार भजनांच्या , कीर्तनाच्या आणि ...

Vairagyamurti Gadge Maharaj's thoughts should reach every household - Sudhir Mungantiwar | वैराग्यमूर्ती गाडगे महाराजांचे विचार घराघरांत पोहोचावे- सुधीर मुनगंटीवार

वैराग्यमूर्ती गाडगे महाराजांचे विचार घराघरांत पोहोचावे- सुधीर मुनगंटीवार

googlenewsNext

चंद्रपूर : समाजाला घडविण्याचे महत्तम कार्य वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराजांनी केले आहे. त्यामुळे त्यांचे विचार भजनांच्या , कीर्तनाच्या आणि कृतीच्या माध्यमातून घराघरांत पोहोचावे अशी अपेक्षा राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. यावेळी श्याम नगरातील सर्व भजन मंडळांना भजन साहित्याचे वितरण करण्यात येईल, अशी घोषणाही ना. मुनगंटीवार यांनी केली. 

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती निमित्त स्वच्छता अभियान व समाज प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महानगरचे महामंत्री ब्रीजभूषण पाझारे, माजी उपमहापौर राहुल पावडे, माजी गटनेता जयश्री जुमडे, माजी नगरसेवक महेंद्र जुमडे, अजय सरकार, मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर, विजय चिताडे, अशोक ताटकंठीवार, रामभाऊ ढगे, किशोर घुसे, कविता जाधव, मनोज पोतराजे, आकाश मस्के, राजकुमार आकापल्लीवार, सुनिल डोंगरे आदी उपस्थित होते. 

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ना. मुनगंटीवार म्हणाले की, संत गाडगे महाराज स्वच्छतेचे व्रत घेऊन प्रबोधन करायचे. आध्यात्मासोबत समाजाला कृती आचरणात कशी आणावी याची शिकवण वैराग्यमूर्ती गाडगे बाबांनी दिली. गाडगे बाबांनी केवळ समाजातच स्वच्छतेचा संदेश दिला नाही तर माणसाला आत्मिक स्वच्छतेचाही संदेश दिला आहे. मानवतेचा धर्म त्यांनी समाजाला शिकविला. १६ मार्च १९९५ ला आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर संत, महंतांच्या सेवेला प्राधान्य दिल्याचे नमूद करीत ना. मुनगंटीवार यांनी नागपूर विद्यापीठाचा नामविस्तार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व अमरावती विद्यापीठाचा नामविस्तार संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ करण्याचे सौभाग्य आपल्याला लाभल्याचे  सांगितले. 

शिखर शिंगणापुरात १ हजार २०० बेलवृक्षांचे संवर्धन करण्याचे सौभाग्य आपल्याला वनमंत्री म्हणून लाभल्याचे सांगत ना. मुनगंटीवार यांनी अशा कार्यांच्या माध्यमातून प्रत्येकाने सामाजिक ऋण फेडावे असे आवाहन केले. भीमाशंकर, औंढानागनाथ, पंढरपुरातील तुळशी वृंद्धावनाचा कायापालट आपल्या हातून झाल्याचाही मनस्वी आनंद वाटतो असेही ना. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. श्रीक्षेत्र माता महांकाली, श्रीक्षेत्र भगवान मार्कडेश्वराचाही कायापालट लवकरच होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

संतांना जातीत विभागू नका 

समाजातील काही स्वार्थी वृत्तीने संतांनाही जातीपातीत विभागाणे सुरू केले आहे. संत जन्मत:च महान असतात. त्यांना जातीच्या जोखडांमध्ये जकडण्याचे पाप कुणी करु नये, असे भावनिक आवाहन करीत ना. मुनगंटीवार यांनी सामाजिक एकोप्याचा संदेश कार्यक्रमात दिला.

नारीशक्तीचा जागर 

कार्यक्रमादरम्यान ना. मुनगंटीवार यांनी नारीशक्तीचा जागर केला. महिला सहनशील आहेत परंतु शक्तीशाली आहेत. सृष्टी सृजनाचे कार्य मातृशक्तीशिवाय अपूर्ण आहे,असे कार्यक्रमात नमूद केले.

Web Title: Vairagyamurti Gadge Maharaj's thoughts should reach every household - Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.