अटलजींचे राष्ट्रउभारणीत अमूल्य योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 10:54 PM2018-08-25T22:54:35+5:302018-08-25T22:55:03+5:30

माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाच्या उभारणीसाठी मोलाचे योगदान दिले. सर्वधर्मसमभाव ही वृत्ती जोपासून त्यांनी राजकारण केले. त्यामुळे अटलजींचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे कायम राहणार आहे, असा सूर श्रद्धांजली कार्यक्रमात उमटला. गुरूवारी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात सर्वपक्षीय व विविध संघटनांनी ही श्रद्धांजली सभा घेतली होती.

Valuable contributions to Atalji's national interest | अटलजींचे राष्ट्रउभारणीत अमूल्य योगदान

अटलजींचे राष्ट्रउभारणीत अमूल्य योगदान

Next
ठळक मुद्देमान्यवरांचा सूर : चंद्रपुरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात सर्वपक्षीय श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाच्या उभारणीसाठी मोलाचे योगदान दिले. सर्वधर्मसमभाव ही वृत्ती जोपासून त्यांनी राजकारण केले. त्यामुळे अटलजींचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे कायम राहणार आहे, असा सूर श्रद्धांजली कार्यक्रमात उमटला. गुरूवारी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात सर्वपक्षीय व विविध संघटनांनी ही श्रद्धांजली सभा घेतली होती.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलीया, आमदार नाना शामकुळे, राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक तुषार देवपुजारी, माजी नगराध्यक्ष गयाचरण त्रिवेदी, महापौर अंजली घोटेकर, शिवसेनेचे किशोर जोरगेवार, मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, रिपाइं (आ.) अशोक घोटेकर, रिपाई नेते व्ही. डी. मेश्राम, भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. रिपाइं (आ.)चे जिल्हाध्यक्ष अशोक घोटेकर, डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार, चंदनसिंह चंदेल, महापौर घोटेकर, गयाचरण त्रिवेदी, देवपुजारी, डॉ. एम. जे. खान यांनी अटलजींच्या राष्ट्र निमार्णातील योगदानाचे स्मरण करून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी अटलजींच्या अस्थिकलशाचे उपस्थितांनी दर्शन घेतले.
ना. अहीर यांनी अटलजींच्या कार्याची माहिती दिली. माजी खासदार पुगलिया यांनीही आठवणींना उजाळा दिला. पक्षाच्या चौकटीत न मावनारे लोकनेते म्हणून अनेकांनी अटलजींचा उल्लेख केला. संचालन अरूंधती कावडकर, नासिर खान यांनी केले. या श्रध्दांजली कार्यक्रमाला चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, भद्रावती, वरोरा, मूल आदी तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. त्यांनीही अटलजींच्या अस्थिकलशाचे घेतले.

Web Title: Valuable contributions to Atalji's national interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.