ज्ञानाचे मूल्य हिऱ्यापेक्षा जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 12:34 AM2019-07-08T00:34:38+5:302019-07-08T00:35:14+5:30

ज्ञानाचे मूल्य कोहिनूर हिऱ्यापेक्षाही मोठे आहे. भविष्यात शाळा-महाविद्यालयात निर्माण होणारी सभागृह ज्ञानाची मंदिरे व्हावीत. तसेच शैक्षणिक संस्थेने विद्यार्थी घडवत असताना त्यांच्यात देशभक्ती व राष्ट्रनिर्माणाची भावना निर्माण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे अर्थ, नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.

The value of knowledge is more than the diamond | ज्ञानाचे मूल्य हिऱ्यापेक्षा जास्त

ज्ञानाचे मूल्य हिऱ्यापेक्षा जास्त

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : अटल प्रयोगशाळा व सभागृहाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ज्ञानाचे मूल्य कोहिनूर हिऱ्यापेक्षाही मोठे आहे. भविष्यात शाळा-महाविद्यालयात निर्माण होणारी सभागृह ज्ञानाची मंदिरे व्हावीत. तसेच शैक्षणिक संस्थेने विद्यार्थी घडवत असताना त्यांच्यात देशभक्ती व राष्ट्रनिर्माणाची भावना निर्माण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे अर्थ, नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड माजरी क्षेत्राचे सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर फंड) बांधकाम करण्यात आलेल्या सभागृहाचा उद्घाटन सोहळा व अटल टिंकरिंग प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संबोधित करताना, देशाचे प्रधानमंत्री अनुसंधानाचा गौरव करत असून त्याकरिता चंद्रपुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सेंटर फॉर इंवेंशन, इनोव्हेशन आणि इंक्युबॅशन ट्रेनिंग या केंद्राची टाटा ट्रस्टच्या सहकार्यातून मुहूर्तमेढ रोवली आहे. या प्रयोगशाळेकरिता टाटा ट्रस्टने १८९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. धावत्या जगातील बदलासोबत चालण्यासाठी अनुसंधनाची गरज असते. याकरिता लोकमान्य विद्यालयातील प्रयोगशाळा मानवाच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याचा दृष्टीकोन देईल. उपजत कल्पना, वैज्ञानिक दृष्टीकोन व अनुसंधनाच्या माध्यमातून जनकल्याण साधले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शिक्षणाचा संबंध धनाशी न जोडता मनाशी जोडला पाहिजे. ज्ञानाची शक्ती कोहिनूर हिºयापेक्षाही मोठी असून शक्ती पेक्षाही युक्ती श्रेष्ठ आहे. या ज्ञानाचा उपयोग राष्ट्राच्या संरक्षणासाठी होण्याकरिता जिल्ह्यातील पहिली तर महाराष्ट्रातील दुसरी असलेल्या सैनिकी शाळेचे उद्घाटन पुढच्या महिन्यात होत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच शाळेतील मुलांच्या प्रयोगांची पाहणी केली. याप्रसंगी निवृत्त शिक्षकांचा सत्कारही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडचे क्षेत्रीय महाप्रबंधक व्ही. के. गुप्ता, प्रबंधक ओ. व्ही. रेड्डी, तहसीलदार महेश शितोळे, मनोहर पारधे, बळवंतदादा गुंडावार, लोकसेवा मंडळाचे सदस्य, लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Web Title: The value of knowledge is more than the diamond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.