वामनपल्लीला गतवैभव प्राप्त होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 05:00 AM2020-12-07T05:00:00+5:302020-12-07T05:00:21+5:30
वामनपल्ली गाव घनदाट जंगलालगत वसले आहे. गावालगत असलेल्या घनदाट जंगलात वन्यजीवांचा मोठा अधिवास आहे. वाघ, बिबट, तृणभक्षक प्राणी आणि दुर्मिळ प्राण्याचा येथे अधिवास आहे. शिकारीसाठी आलेले ब्रिटिश अधिकारी वनविभागाचे चौकीदार आणि गावकऱ्यांना सोबत घेऊन जंगलात शिकारीला जात असत. ब्रिटीशांचा शिकारीचा कथा आजही गावातील वृध्दांच्या ओठावर आहेत. कधी काळी वर्दळ असलेले वामनपल्ली गाव आज भकास झाले आहे.
निलेश झाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी : कन्हाळगाव अभयारण्य घोषित झाले अन कन्हाळगाव, वामनपल्लीला गतवैभव प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाला. ब्रिटिश काळात कन्हाळगाव आणि वामनपल्लीची शुटींग ब्लाक अशी ओळख होती. शिकारीसाठी आलेले राजे, ब्रिटिश अधिकारी वामनपल्ली येथे मुक्कामाने थांबायचे. ब्रिटीशांनी केलेल्या शिकारीचा कथा गावातील वृध्द आजही ऐकवितात. आता कन्हाळगाव अभयारण्य घोषित झाल्याने वामनपल्लीला गतवैभव प्राप्त होणार, अशी आशा वामनपल्लीवासीयांना आहे.
ब्रिटिश काळात चंद्रपूर जिल्ह्यातील वनसंपदा मोठी होती.
जिल्हाच्या शेवटचा टोकावर असलेले कन्हाळगाव, वामणपल्ली शुटिंग ब्लाक म्हणून ओळखले जायचे. राजे, ब्रिटिश अधिकारी येथे शिकारीसाठी यायचे. शिकारीसाठी आलेले ब्रिटीश कन्हाळगाव आणि वामनपल्ली येथे मुक्कामाने थांबायचे. वामनपल्ली येथे गेस्ट हाऊस होते.
आज गेस्ट हाऊस जमीनदोस्त झाले आहे.
आता शासनाने काही दिवसांपूर्वीच कन्हाळगाव हा परिसर अभयारण्य घोषित केला आहे. तशी आधीपासूनच येथील नागरिक व लोकप्रतिनिधींची मागणी होती. ती पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे या जंगलात वाघ, बिबटसह अनेक वन्यप्राण्यांचा अधिवास आहे.
ब्रिटीशांचे होते शिकारस्थळ
वामनपल्ली गाव घनदाट जंगलालगत वसले आहे. गावालगत असलेल्या घनदाट जंगलात वन्यजीवांचा मोठा अधिवास आहे. वाघ, बिबट, तृणभक्षक प्राणी आणि दुर्मिळ प्राण्याचा येथे अधिवास आहे. शिकारीसाठी आलेले ब्रिटिश अधिकारी वनविभागाचे चौकीदार आणि गावकऱ्यांना सोबत घेऊन जंगलात शिकारीला जात असत. ब्रिटीशांचा शिकारीचा कथा आजही गावातील वृध्दांच्या ओठावर आहेत. कधी काळी वर्दळ असलेले वामनपल्ली गाव आज भकास झाले आहे. मात्र काळाचा ओघात विस्मृतीत गेलेला वामनपल्लीचा इतिहास कन्हाळगाव अभयारण्य घोषित होताच पुन्हा उजेडात आला आहे. आता गावाचा विकास होईल, अशी आशा ग्रामस्थांना आहे.
ब्रिटिश काळात वामनपल्ली गाव महत्त्वाचे ठिकाण होते. आज गाव मागासलेले आहे. ब्रिटिश काळाप्रमाणेच वामनपल्ली येथे वनविभागाने नव्याने गेस्ट हाऊस तयार करावे. अभयारण्याचे प्रवेशव्दार वामनपल्ली येथे उभे करावे. कन्हाळगाव अभयारण्य अंतर्गत होणाºया विकासकामात गावाला आणि गावातील बेरोजगारांना प्रथम संधी द्यावी.
- साईनाथ कोडापे, माजी सरपंच, लाठी.