सुमठाना येथे बांधला वनराई बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:27 AM2020-12-22T04:27:00+5:302020-12-22T04:27:00+5:30
गोवरी : दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या, मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण, जंगल तोड, जल प्रदूषण, कमी पाऊस, आटते जलस्त्रोत, उपलब्ध जलसाठ्यांचा गैरवापर ...
गोवरी : दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या, मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण, जंगल तोड, जल प्रदूषण, कमी पाऊस, आटते जलस्त्रोत, उपलब्ध जलसाठ्यांचा गैरवापर यांच्यामुळे पाणी टंचाई जाणवत आहे. पाणी टंचाईला आळा घालण्यासाठी अंबुजा सिमेंट फाऊंडेशन उपरवाहीच्या वतीने लोकसहभागतून राजुरा तालुक्यातील सुमठाना येथील नाल्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला.
दिवसेंदिवस पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. त्या उद्देशाने वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना पाण्याचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अंबुजा सिमेंट फाउंडेशन उपरवाही प्रक्षेत्र अधिकारी गोपाल जंबुलवार, रुपेश गेडेकर आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी सचिन डंबारे, अरुण डंबारे, सुनील सोयाम, शरद नगराळे, प्रमोद देवतळे, गजानन झाडे, संगपाल वाघमारे, सुरज माणुसमारे, मधुकर चौधरी, किशोर मोहुर्ले, राकेश चौधरी, पुरुषोत्तम चौधरी, बंडु देशमुख आदींनी परिश्रम घेतले.