गिधाडाचे संगोपन, संवर्धनासाठी उपहारगृह

By admin | Published: April 3, 2015 01:05 AM2015-04-03T01:05:39+5:302015-04-03T01:05:39+5:30

मेलेल्या जनावरांमुळे गावात होणारी अस्वच्छता हटविण्यासाठी गिधाडाची महत्त्वाची भूमिका असायची.

Vantage ranching, conservation kitchens | गिधाडाचे संगोपन, संवर्धनासाठी उपहारगृह

गिधाडाचे संगोपन, संवर्धनासाठी उपहारगृह

Next

चिचपल्ली वनपरिक्षेत्र : वनपालाचा अभिनव उपक्रम
राजू गेडाम ल्ल मूल

मेलेल्या जनावरांमुळे गावात होणारी अस्वच्छता हटविण्यासाठी गिधाडाची महत्त्वाची भूमिका असायची. मात्र गिधाडाची संख्या आपोआप घटल्याने गावात मेलेल्या प्राण्यांमुळे विविध आजाराला आमंत्रण मिळत आहे. याची दखल घेत गिधाडाचे संगोपन व संवर्धन करण्यासाठी चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील केळझरचे वनपाल विदेश गलगट यांनी ‘गिधाड उपहार गृह’ सुरू केला आहे.
दाबगाव (मक्ता) येथील कक्ष क्र. ६८५ मध्ये सदर उपहारगृह निर्माण केले असून गिधाड नष्ट झाल्याने जी प्राण्यांची अन्न साखळी खुटंली आहे, ती जोडण्याचा प्रयत्न वनपाल विदेश गलगट व त्यांचे सहकारी करीत असल्याने सदर उपक्रमाचे कौतुक होत आहे.
पूर्वीच्या काळात गिधाडाची संख्या मोठ्या प्रमाणात होती. मेलेली जनावरे गावाबाहेर टाकल्यानंतर त्यात गिधाडे तुटून पडून असलेले मास भक्ष करायचे.
त्यामुळे गावात होणारी अस्वच्छता टाळता येत होती. विशेषत: गावात मळेखट, आखर, गायरान, डोरफोडी अशा ठिकाणी मेलेली जनावरे टाकली जायची. मात्र दिवसेंदिवस बैलाचे मांस खाण्याचे प्रमाण वाढले, तेव्हापासून बैलाचे मांस मिळणे दुरपास्त झाले. तसेच पर्यावरणाचा ढासळतत चाललेला समतोल बघता गिधाड नामशेष होण्याला कारण ठरले.
ज्या वनविभागात आपण काम करतो त्यात नवनवीन उपक्रम राबविले तर इतरांना प्रेरणा मिळू शकते, हे हेरुन वनपाल विदेश गलगट यांनी वनपरिक्षेत्र कार्यालय चिचपल्ली येथील सहाय्यक वनसंरक्षक विवेक मोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी पठाण यांना गिधाडांचे संगोपन व संवर्धन करण्यासाठी उपहार गृहाची कल्पना दिली.
त्यानंतर गलगट यांनी सुशी येथील वनरक्षक कैलास तोडासे, वनमजूर, रवी कवळे, पुरुषोत्तम वाढई, राजकुमार वेलादी, रफीक शेख, बबन ढोले यांच्याशी उपगृहार गृहाची मांडणी व रचनेबाबत चर्चा केली. त्यानंतर दाबगाव मक्ता येथील कक्ष क्र. ६७५ मध्ये गिधाड उपहार गृह उभारले.

असे आहे उपहारगृह
वनविभागाने उभारलेल्या उपहारगृहात गिधाडांना बसण्यासाठी मचान स्वरूपात मंडप उभारण्यात आले आहे. येथे उंच झाडेदेखील आहेत. मेलेल्या प्राण्यांचे मांस त्यात टाकून ठेवल्याचे दिसून आले. मेलेल्या प्राण्यांच्या वासाने गिधाड हमखास येतात, असा आजपर्यंतचा अंदाज असल्याने हा प्रयोग उपायोगी ठरेल, असा विश्वास वनपाल विदेश गलगट यांना आहे.

Web Title: Vantage ranching, conservation kitchens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.