ब्रह्मपुरी येथे बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 01:21 AM2018-04-12T01:21:37+5:302018-04-12T01:21:37+5:30

क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त दी बुद्धीस्ट एम्प्लाईज अँड नॉन एम्प्लाईज सोशल असोसिएशन ब्रह्मपुरीच्या वतीने विविध स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेतील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

Various competitions for the occasion of Babasaheb Ambedkar Jayanti at Brahmapuri | ब्रह्मपुरी येथे बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध स्पर्धा

ब्रह्मपुरी येथे बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध स्पर्धा

googlenewsNext
ठळक मुद्देदी बुद्धीस्ट एम्प्लॉईज सोशल असोसिएशनचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त दी बुद्धीस्ट एम्प्लाईज अँड नॉन एम्प्लाईज सोशल असोसिएशन ब्रह्मपुरीच्या वतीने विविध स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेतील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
यामध्ये महामानवांच्या जीवनकार्यावर आधारीत २१ तास अखंड वाचन स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. २१ ताख अखंड वाचन स्पर्धेमध्ये कल्पक प्रभुदास कसारे, प्रवीण विलास आंबोरकर, झरिना सोमेश्वर खरकाटे, आर्यन अरविंद ढवळे, अथर्व अरविंद ढवळे, सुनिमा सुभाष मेश्राम, प्राची तात्याजी मेश्राम, अनिल यादव निमज हे विद्यार्थी पात्र ठरले. तर निबंध स्पर्धेमध्ये साक्षी खोब्रागडे हिने ब गटातून प्रथम क्रमांक, अ गटातून चेतन प्रमोद राखडे, क गटातून लिलाधर हरिश्चंद्र मेश्राम, द्वितीय सचिन गोवर्धन शेंडे व तृतीय अक्षय विनोद वासनिक यांनी पटकाविला. तर वक्तृत्व स्पर्धेमध्ये अ गटातून सायली जीवन व्यवहारे हिने प्रथम, ब गटातून प्राची तात्याजी मेश्राम, द्वितीय यश ताराचंद कुंभारे क गटातून प्रथम अक्षय विनोद वासनिक तर चित्रकला स्पर्धेमध्ये अ गटातून प्रथम प्रणय विलास गौरकर, द्वितीय साई मनोजकुमार माटे, तृतीय कल्याणी प्रमोद राखडे ब गटातून साक्षी जीवन खोब्रागडे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. सर्व विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीसांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर मार्गदर्शनाचा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. प्रेमलाल मेश्राम यांच्या हस्ते पार पडले. तर अध्यक्षस्थानी संघटनेचे मुख्य प्रवर्तन अध्यक्ष परमानंद नंदेश्वर तर प्रमुख अतिथी म्हणून अ‍ॅड. एकनाथ रामटेके औरंगाबाद, विश्वजीत लोणारे, शांताराम भैसारे, शारदा सोरदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. संचालन वैकुंठ टेंभुर्णे, सतीश डोंगे व आभार अनिल वाळके यांनी मानले.

Web Title: Various competitions for the occasion of Babasaheb Ambedkar Jayanti at Brahmapuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.