आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या; मंत्री अमित देशमुखांना जावं लागलं रोषाला सामोरं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 05:04 PM2021-04-27T17:04:23+5:302021-04-27T17:04:52+5:30
देशमुख यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हेदेखील देशमुख यांच्यासह उपस्थित होते.
चंद्रपूर : राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांना चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या डेरा आंदोलनातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी आमच्या मागण्यांकडॆ प्रशासन व शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून आंदोलनकर्त्यांनी देशमुख गो बॅकच्या घोषणा दिल्या. यावेळी काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
देशमुख यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हेदेखील देशमुख यांच्यासह उपस्थित होते. पत्रकार परिषद सुरू असताना आंदोलनातील दोन महिला कार्यकर्त्यांनी उभे राहून आपल्या आंदोलनाकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप करताना आपल्या व्यथा मांडल्या. सुमारे महिनाभरापासून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी वेतनाचा प्रश्न घेऊन डेरा आंदोलन सुरू केले आहे. सभागृहाबाहेर आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. देशमुख आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.