कोंडय्या महाराज यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम

By admin | Published: January 18, 2015 11:19 PM2015-01-18T23:19:49+5:302015-01-18T23:19:49+5:30

विदर्भ आणि आंध्रप्रदेशातील भाविकांचे आराध्य दैवत श्री संत कोंडय्या महाराज यात्रा महोत्सव १९ जानेवारीपासून सुरू होत आहे. २४ जानेवारीला गोपालकाला व महाप्रसादाने यात्रेचा समारोप होणार आहे.

Various programs on the occasion of Kondaiah Maharaj Yatra | कोंडय्या महाराज यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम

कोंडय्या महाराज यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम

Next

धाबा : विदर्भ आणि आंध्रप्रदेशातील भाविकांचे आराध्य दैवत श्री संत कोंडय्या महाराज यात्रा महोत्सव १९ जानेवारीपासून सुरू होत आहे. २४ जानेवारीला गोपालकाला व महाप्रसादाने यात्रेचा समारोप होणार आहे.
१९ जानेवारीला पहाटे समाधी महापूजेनंतर महाराजांची पालखी धाबा गावातील प्रमुख मार्गाने काढण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजता हभप सांगडे महाराजांचे कीर्तन व नंतर खंजिरी भजन स्पर्धा उद्घाटन व स्पर्धेला सुरुवात दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता घटस्थापना व यात्रा शुभारंभ आ. संजय धोटे व सपत्निक तेलंगना आ. कोणेरी कोनप्पा यांच्या हस्ते होईल. रोज भजन मंडळाकडून भजनाचा कार्यक्रम होईल. भावना तन्नीरवार न्ीाता कोंतमवार यांचेकडून ‘तुका आकाशाएवढा’ संत तुकारामाच्या अभंगावर आधारित कार्यक्रम आ. उद्धवराव सिंगाडे महाराज ब्रह्मपुरी यांचे कीर्तन, प्रख्यात गायक मोतीराम चौधरी वडसा यांचे भक्तीगीताचा कार्यक्रम, १५ वर्षाचा बाल कलाकार रामदास ताविळे व १४ वर्षाची बालकीर्तनकार नीलिमा कुबडे यांचे कीर्तन होईल.
महाराजांच्या जन्मदिनानिमित्त २३ जानेवारीला ८ वा. सप्त खंजेरीवादक संदीप पाल महाराज अमरावती यांचे समाज प्रबोधनपर किर्तन होईल. हभप सुरेखा कोकोडे (यवतमाळ) यांचे कीर्तन, शंकरअय्या महाराज अंबेदवार व तुलशी तमेश्वर रोगमवार महाराज व बाबुराव महाराज कुझीकांत राजुरा व सहकारी २३ जानेवारी रात्रो २ वाजता अग्नीकुंड प्रभावळीचा विधी सुरू करतील. पहाटे ५ वाजता अग्निकुंड प्रभावळी विशेष सोहळा सुरू होईल. यावेळी आंध्र व तेलंगाना व विदर्भातील लाखो भाविकांची उपस्थिती राहणार आहे.
समारोपाचे कीर्तन हभप लक्ष्मणदास काळे महाराज करणार आहेत. गोपालकाला आणि महाप्रसाद वितरणानंतर यात्रा महोत्सवाची सांगत होईल. यात्रा महोत्सवात मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहावे, अशी विनंती विश्वस्त मंडळातर्फे करण्यात येत आहे. (वार्ताहर)

Web Title: Various programs on the occasion of Kondaiah Maharaj Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.