साईबाबा बहुउद्देशीय संस्थेतर्फे विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:32 AM2021-01-08T05:32:47+5:302021-01-08T05:32:47+5:30

चंद्रपूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राजमाता यंग गृप व साईबाबा बहुद्देशीय शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विठ्ठल ...

Various programs by Saibaba Multipurpose Organization | साईबाबा बहुउद्देशीय संस्थेतर्फे विविध कार्यक्रम

साईबाबा बहुउद्देशीय संस्थेतर्फे विविध कार्यक्रम

Next

चंद्रपूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राजमाता यंग गृप व साईबाबा बहुद्देशीय शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विठ्ठल मंदिर वाॅर्डातील स्टेडियममध्ये टाकाऊपासून टिकाऊ स्पर्धा, आनंद मेला, गायन, वाद्य, व नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत अनेकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन मजदूर युनियन सिमेंट गडचांदूरचे बी. पी. सिंग यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ़. पालीवाल, युवासेना जिल्हा प्रमुख प्रा. नीलेश बेलखेडे, साईबाबा बहुद्देशीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष नंदाताई अल्लुरवार, शिवसेना महिला शहर प्रमुख वर्षा कोठेकर, युवासेना शहर प्रमुख अक्षय आंबिरवार, अतुल ठाकरे, नेत्रा इंगुलवार, तुळशीराम जांभूळकर, मिस ग्लोबल इंडिया स्मिता चावडा, मानव अधिकार समितीचे जिल्हा प्रमुख करण कोलुगिरीजी, दिव्यांग संस्थानच्या रत्ना, राजमाता यंग ग्रुपच्या अध्यक्षा प्रगती पडगेलवार आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना साईबाबा संस्थेच्या अध्यक्ष नंदाताई अल्लूरवार म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणांची दारे उघडी करुन दिली. त्यामुळे आज महिला या सुशिक्षित होऊन मोठमोठी पदे भूषवित आहेत. त्याचा आदर्श सर्वानी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.

------

-----

महिला काँग्रेसतर्फे मनपा स्वच्छतादूतांचा सत्कार

फोटो

चंद्रपूर : अनुसूचित जाती विभाग शहर महिला काँग्रेस व प्रबोधिनी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. कोरोना काळात मनपा स्वच्छतादूतांनी न घाबरता आपले कार्य प्रामाणिकपणे पार पडले. त्यामुळे मनपा स्वच्छतादूत महिलांचा साडी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, अनुसूचित जाती विभाग प्रदेश उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल भाई, प्रशांत भरती, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, प्रदेश सचिव महिला काँग्रेस नम्रता ठेमस्कर, सुनिता धोटे, वंदना भागवत, डॉ. राजेश दहेगवकर, अविनाश टिपले आदी उपस्थित होते. यावेळी मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या संचालिका प्रणिता शेंडे, वनिता भागवत, शिला दहिवले, सुनंदा दहिवले, सुनंदा दुर्योधन, शिल्पा दहेगवकर, छाया वानखेडे, उर्मिला माथनकर, सुनीता बागेसार, वंदना बांबोडे, व्यवस्थापक सचिन रामटेके, राहील आहुजा उपस्थित होते. संचालन शिल्पा दहेगावकर यांनी केले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.

Web Title: Various programs by Saibaba Multipurpose Organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.