आदिम जमातीच्या विकासाकरिता विविध योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:34 AM2021-09-09T04:34:43+5:302021-09-09T04:34:43+5:30

चंद्रपूर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, केंद्रीय क्षेत्र योजनेंतर्गत आदिम जमातीच्या विकासाकरिता शेळी गट वाटप योजना (१० शेळ्या व ...

Various schemes for the development of aboriginal tribes | आदिम जमातीच्या विकासाकरिता विविध योजना

आदिम जमातीच्या विकासाकरिता विविध योजना

Next

चंद्रपूर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, केंद्रीय क्षेत्र योजनेंतर्गत आदिम जमातीच्या विकासाकरिता शेळी गट वाटप योजना (१० शेळ्या व १ बोकड), औषधी वनस्पतीची लागवड व फलोद्यान, कृषी व पशुपालन प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, जिवती, कोरपना, पोभुर्णा, गोंडपिपरी, मूल, सिंदेवाही, सावली या तालुक्यांमधील अधिवास असलेल्या कोलाम जमातीच्या लाभार्थ्यांकडून या योजनांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असलेल्या व अटींची पूर्तता करणाऱ्या आदिम जमातीच्या लाभार्थ्यांनी परिपूर्ण कागदपत्रांसह आपले अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर येथे सादर करावे. या योजनेचे अर्ज प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर, शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय मुला-मुलींचे वसतिगृह येथे २० सप्टेंबर या कालावधीत नि:शुल्क उपलब्ध आहेत.

बॉक्स

शेळी गट वाटप योजना

दुर्गम भागातील आदिम जमातीचे कुटुंब शेतमजूर, भूमिहीन असावे, वार्षिक उत्पन्न २० हजारांच्या आत, लाभार्थी कुटुंबाकडे किमान ३०० चौ. मी. स्वतःची जागा असावी तसेच यापूर्वी लाभार्थी कुटुंबाने अन्य कोणत्याही योजनेंतर्गंत दुधाळ जनावर, शेळी गट पुरवठा योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

---------------

औषधी वनस्पतीची लागवड व फलोद्यान योजना

लाभार्थी हा आदिम जमातीचा असावा, लाभार्थ्यांकडे रोपवाटिकेसाठी स्वतःची जागा असावी, मुख्यत: आदिम जमातीच्या पारंपरिक वैदूंना प्राधान्य, निवड झालेल्या लाभार्थ्यांला दोन दिवसाचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील.

-------

कृषी व पशुपालन प्रशिक्षण योजना

प्रशिक्षणार्थी लाभार्थी हा आदिम जमातीचा शेतकरी असावा. या योजनेत निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना संपूर्ण प्रशिक्षणाचे टप्पे पूर्ण करणे बंधनकारक राहील तसेच प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण करण्याची आवड व शेती करण्याची रुची असावी.

Web Title: Various schemes for the development of aboriginal tribes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.