गिरगाव येथील रानभाजी महोत्सवात विविध भाज्यांचा झाला परिचय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:33 AM2021-08-18T04:33:14+5:302021-08-18T04:33:14+5:30

उद्घाटन जिल्हा परिषद विरोधी पक्ष गटनेते डॉ. सतीश वारजूकर व जि. प. सदस्य खोजराम मरस्‍कोल्हे यांच्या हस्ते पार ...

Various vegetables were introduced at the Ranbhaji Mahotsav at Girgaum | गिरगाव येथील रानभाजी महोत्सवात विविध भाज्यांचा झाला परिचय

गिरगाव येथील रानभाजी महोत्सवात विविध भाज्यांचा झाला परिचय

Next

उद्घाटन जिल्हा परिषद विरोधी पक्ष गटनेते डॉ. सतीश वारजूकर व जि. प. सदस्य खोजराम मरस्‍कोल्हे यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती प्रफुल खापर्डे होते. प्रमुख अतिथी म्हणून जि. प. सदस्य नयना गेडाम, सरपंच प्रशांत गायकवाड, उपसरपंच शरद सोनवाणे यांची उपस्थिती होती. यावेळी रानभाजी महोत्सवात तालुका कृषी अधिकारी एस. पी. गजभिये, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जे. व्ही. कावळे, मंडळ कृषी अधिकारी पी. एस. शिंदे, कृषी सहायक आर. एस. वानखेडे यांनी मार्गदर्शन केले. पंजाबराव कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कल्याणी सोनवाने हिने पाहुण्यांना रानभाजीच्या वळ्या खाऊ घातल्या. सुधाकर झोडे भुज, प्रेमलता बोरकर उमरवाही, देवानंद सोनवाने, हरिदास श्रीरामे, लक्ष्मण डोंगरवार,चंदू शेंडे, मंथन सोनवाणे आदींनी विविध रानभाज्यांचे स्टॉल लावून सहभाग दर्शविला. प्रास्ताविक जे. व्ही. कावळे तर संचालन पुरुषोत्तम बोरकर यांनी केले. आभार अ. जै. गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमासाठी व्यवस्थापक सुनील सोनवाणे, अशोक शेंडे, मधुकर श्रीरामे, परमानंद बोरकर, संजय सोनवाणे, सरिता सोनवाणे, ताराचंद शेंडे, गजानन मांदाळे, भूषण गिरडकर, किशोर सोनवाणे, प्रकाश गिरडकर, दिलीप गायकवाड, भैयाजी गिरडकर आदींनी सहकार्य केले.

(कृपया सदर बातमी लावावी. तालुका पुरवणीसाठी हाप पेजची जाहिरात आहे यांची)

Web Title: Various vegetables were introduced at the Ranbhaji Mahotsav at Girgaum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.