वेकोलिमार्फत उभारत आहे कोरोना रूग्ण विलगीकरण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:28 AM2021-05-11T04:28:59+5:302021-05-11T04:28:59+5:30
चंद्रपूर : घुग्घुस-वेकोली परिसरात कोरोना बाधित रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी वेकोलि तर्फे घुग्घुस-वणी रोडवर असणारे ...
चंद्रपूर : घुग्घुस-वेकोली परिसरात कोरोना बाधित रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी वेकोलि तर्फे घुग्घुस-वणी रोडवर असणारे टेम्पो क्लब येथे विलगीकरण कक्ष उभारले जात आहे.
जिल्ह्यातील घुग्घुस हे क्षेत्र औद्योगिक प्रसिद्ध आहे. कोळसा खणीसह इतर उद्योग येथे असताना कोरोनाच्या काळात विलगीकरणात उपचारासाठी लोकांना चंद्रपूरवर अवलंबून राहावे लागत आहे, वेकोलि वणी क्षेत्रातील राजीव रतन रुग्णालयातील आरोग्य सेवक, डॉक्टरर्स कोरोना रुग्णाच्या उपचाराकरिता कर्तव्य बजावत आहेत. मात्र, रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने वेकोलिने विलगीकरण कक्ष उभारावे अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीयमंत्री हंसराज अहिर यांनी वेकोलि प्रशासनाकडे केली होती. त्याचा परिपाक म्हणून आता कक्ष उभारले जात आहे. वेकोलिच्या सेवेमुळे अनेक रुग्ण मृत्यूच्या दारातून परत आले आहेत. सध्या घुग्घुस वेकोली परिसरातील रुग्णासाठी राजीव रतन रुग्णालय वरदानच आहे. त्यातच वेकोलिच्या माध्यमातून घुग्घुस-वणी रोडवर असणारे टेम्पो क्लब येथे कोरोना संक्रमित रुग्णासाठी विलगीकरण कक्ष उभारण्याचे कार्य रुग्णांना दिलासा देणारे आहे. सद्यस्थितीत २५ बेडची व्यवस्था करण्यात आली, अशी माहिती जि. प. सदस्य
ब्रिजभूषण पाझारे यांनी पाहणी दरम्यान दिली. यावेळी वेकोलि उपमहाव्यवस्थापक निर्मल संतोष कुमार, सुरक्षा अधिकारी सुदर्शन बल्लेवार, नकोडा उपसरपंच मंगेश राजगडकर, ग्रा. पं. सदस्य रजत तुरानकार आदी उपस्थिती होती.