औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या चंद्रपूरच्या बाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 10:46 AM2021-06-14T10:46:12+5:302021-06-14T10:46:38+5:30
Chandrapur News रुचकर, चवदार आणि औषधी गुणर्धांमुळे नावारूपाला आलेल्या रानभाज्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. पावसाळ्यात मिळणाऱ्या या भाज्या खरेदीला चंद्रपूरकर पसंती देत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील बाजारपेठेत रुचकर, चवदार आणि औषधी गुणर्धांमुळे नावारूपाला आलेल्या रानभाज्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. पावसाळ्यात मिळणाऱ्या या भाज्या खरेदीला चंद्रपूरकर पसंती देत आहेत.
कुड्याची फुले, पातूर, तरोटा अशा विविध प्रकारच्या भाज्या भाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. या भाजीमध्ये औषधी गुणधर्म असतात, तसेच चवीसाठी चांगल्या असतात. त्यामुळे या रानभाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. चंद्रपूर शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर या रानभाज्या विक्रीसाठी आणत आहेत. निर्बंध हटले असल्याने त्यांना शहरात येणे सहज शक्य झाले आहे.
कोणतीही लागवड न करता, खते व कीटकनाशके न वापरता पूर्णत: नैसर्गिक असतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला वर्षातून एकदाच या भाज्या मिळत असतात. त्यामुळे चंद्रपूरकर या भाज्या खरेदीसाठी बाजारपेठेत येत आहेत. यातून विक्रेत्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. साधारणत: १० ते २० रुपये जुडी या दराने या भाज्याची विक्री केली जात आहे. चंद्रपूरकरही आवडीने या भाज्याची खरेदी करीत आहेत.