मोकाट जनावरांमुळे वाहनधारक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:33 AM2021-09-04T04:33:29+5:302021-09-04T04:33:29+5:30
चंद्रपूर : शहरात ठिकठिकाणी मोकाट जनावरांचा ठिय्या आणि रस्त्यावर मुक्त संचारामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मोकाट जनावरांचा ...
चंद्रपूर : शहरात ठिकठिकाणी मोकाट जनावरांचा ठिय्या आणि रस्त्यावर मुक्त संचारामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे. बाजारामध्ये नागरिकांची गर्दी वाढली आहे. त्यातच रस्त्यावर जनावरांचा मुक्त संचार असल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बाबुपेठ पुलाचे काम गतीने करावे
चंद्रपूर : येथील बाबुपेठ रेल्वे पुलाचे काम रखडल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या पुलाचे बांधकाम त्वरित करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
खड्ड्यांमुळे वाढले विविध आजार
जिवती : तालुक्यातील अनेक गावांतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे प्रवास करताना विविध अडचणी येतात. यातच विविध आजार वाढले आहेत. याकडे लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी साचून राहत असल्यामुळे त्या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी, अपघात होण्याची शक्यता आहे.
प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला
चंद्रपूर : काही व्यावसायिक मोठ्या प्रमाणात शहरात प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना देत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.