उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनाची नोंदणी आॅनलाईन

By admin | Published: April 27, 2017 12:46 AM2017-04-27T00:46:46+5:302017-04-27T00:46:46+5:30

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनाची नोंदणी करण्यासाठी बराच कलावधी लागायचा मात्र चंद्रपूर येथील आरटीओ कार्यालयात मंगळवारला वाहन ४.० हे नवीन व्हर्जन सुरु करण्यात आले आहे.

Vehicle Registration Online in Sub-Regional Transport Office | उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनाची नोंदणी आॅनलाईन

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनाची नोंदणी आॅनलाईन

Next

पहिल्या वाहन नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण : सारथी वाहन प्रणालीचा वापर
चंद्रपूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनाची नोंदणी करण्यासाठी बराच कलावधी लागायचा मात्र चंद्रपूर येथील आरटीओ कार्यालयात मंगळवारला वाहन ४.० हे नवीन व्हर्जन सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनाची नोंदणी आॅनलाईन होणार आहे. पहिल्या नोंदणी पत्राचे वितरण मंगळवारला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले.
सर्व उपप्रदेशिक कार्यालयात सारथीचा वापर करुन आॅनलाईन कामे करण्याच्या सुचना देण्यात आल्या. त्यानुसार परिवहन डॉट जीओवी डॉट ईन वाहन हे संकेत स्थळ उपलब्ध केले असून त्यामध्ये वाहनाची नोंदणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर फॅन्सी नं हेव असलेल्यांना परिवहन डॉट जीओवी डॉट ईन फॅन्सी या संकतेस्थळावरुन आपल्याला हवा तसा नंबरसाठी अर्ज करता येतो. या संके तसंस्थळावरुन आॅनलाईन अर्ज भरुन त्याची प्रत आरटीओ कार्यालयात जमा करावी लागेल.
पूर्वी वाहनांची नोंद ही राज्य शासनाच्या वाहन १.० यावरुन करण्यात येत होती. आता केंद्र शासनाच्या परिवहन सेवातंर्गत हे नवीन व्हर्जन सुरु करण्यात आले आहे.त्यानुसार सदर कामे आॅनलाईन पद्धतीने सुरु आहे. त्यानुसार चंद्रपूर येथील पहिल्या आॅनलाईन नोंदनीचे प्रमाणपत्र घनश्याम रिठे यांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी साहायक उपप्रदेशिक परिवहन अधिकारी डी.डी.कुकडे, मोटार वाहन निरिक्षक तुकाराम सपकाळ, साहायक मोटार वाहन निरिक्षक प्रफुल मेश्राम, अमोल दांडवे, पंकज मडावी, कल्पना फुलझेले, प्रणाली प्रशासक, ममता ठाकरे आदी उपस्थित होते. करण्यात आले. (नगर प्रतिनिधी)

परिवहन डॉट जीओवी डॉट ईन वाहन हे व्हर्जन मंगळवारपासून सुरु करण्यात आले असून त्यामुळे नागरिकांची कामे लवकर होणार आहेत.लवकरच एसबीआय ई पे सुरु करण्यात येणार असून संपूर्ण आरटीओ कार्यालय कॅ शलेस होणार आहे.
- विनय अहिरे,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर

Web Title: Vehicle Registration Online in Sub-Regional Transport Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.