वाहनमालकानेच लावला चोरीच्या वाहनाचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2016 12:35 AM2016-06-18T00:35:19+5:302016-06-18T00:35:19+5:30

शहरात गेल्या पंधरवड्यात तीन मोटरसायकली, १० मोबाईल चोरी व दोन घरफोडीच्या घटना घडल्या.

Vehicle search | वाहनमालकानेच लावला चोरीच्या वाहनाचा शोध

वाहनमालकानेच लावला चोरीच्या वाहनाचा शोध

googlenewsNext

चोरटे मोकाटच : ब्रह्मपुरी शहरात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ
ब्रह्मपुरी : शहरात गेल्या पंधरवड्यात तीन मोटरसायकली, १० मोबाईल चोरी व दोन घरफोडीच्या घटना घडल्या. मात्र चोरटे पोलिसांच्या हाती लागले नाही. चोरटे चोरीच्या वाहनांचे नंबरप्लेट बदलवून फिरत असताना गाडीमालकाला दिसले. त्यामुळे त्यांचा पाठलाग करून गाडी परत मिळविण्यात यश आले असले तरी अद्यापही चोरटे पोलिसांच्या हाती लागलेले नाही.
प्रा. डॉ. युवराज मेश्राम यांची दुचाकी भर दुपारी घराजवळून चोरीला गेली. त्यानंतर दर्वे व पुन्हा एकाचे दुचाकी वाहन अशी तीन वाहने दोन दिवसात चोरीला गेली. शुक्रवारच्या बाजारात नामदेव बगमारे, विजय कुंभारे यांच्यासह १० नागरिकांचे महागडे मोबाईल चोरीला गेले. याच काळात तंत्रनिकेतन वसाहतीत तीन घरफोड्या व तहसील कार्यालयासमोरील सहारे यांच्या घरी चोरी झाली. एकही चोर पोलिसांना गवसलेला नाही. त्यामुळे चोरट्यांची भिती निर्माण झाली.
चोरट्यांनी शक्कल लढवित वाहनाचे नंबर प्लेट बदलून शहरात फिरायला सुरूवात केली. प्रा.मेश्राम हे नेहमीप्रमाणे कटाक्षाने वाहनांवर लक्ष ठेवून असताना त्यांच्या महा-३४- ०५२० क्रमांकाची नंबरप्लेट दर्वे यांच्या यांच्या दुचाकी वाहनाला लावलेली दिसली. त्यांनी पुन्हा शोध घेतला असता, ख्रिस्तानंद स्कूलजवळ बेवारस अवस्थेत विना नंबरची हिरोहोंडा फॅशन दुचाकी उभी दिसली. त्यांनी आपले वाहन ताब्यात घेतले. दर्वे यांनाही त्यांचे वाहन सापडले. या सर्व घटनेवरुन दुचाकी वाहन मालकच पोलिसांची भूमिका बजावत होते. परंतु, चोरांची टोळी मात्र हाती लागू शकली नाही. या सर्व प्रकरणाचा छडा लावून चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Vehicle search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.