रेतीची अवैध वाहतूक करणारे वाहन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:28 AM2021-01-20T04:28:53+5:302021-01-20T04:28:53+5:30

चंद्रपूर : रेतीचे अवैध खनन करून वाहतूक करणाऱ्या टिप्परवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून जप्त केले. याप्रकरणी वाहनचालक वाजीद ...

Vehicles transporting sand illegally seized | रेतीची अवैध वाहतूक करणारे वाहन जप्त

रेतीची अवैध वाहतूक करणारे वाहन जप्त

Next

चंद्रपूर : रेतीचे अवैध खनन करून वाहतूक करणाऱ्या टिप्परवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून जप्त केले. याप्रकरणी वाहनचालक वाजीद खान अहमद खान (२६), रब्बुल नैमुल खान सुंदरनगर नागपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैनगंगा नदीच्या गुडेगाव घाटावरून गौण खनिज रेती चोरी करून नागभीडकडे येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागभीड टी-पाॅईंटजवळ नाकाबंदी करून एमएच ४० बीजी ८६७४ क्रमांकाच्या चारचाकी टिप्परला थांबवून चौकशी केली. यावेळी रेतीची अवैध वाहतूक करीत असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी टिप्पर जप्त करून वाहनचालक व वाहकावर नागभीड पोलीस स्टेशन येथे कलम ३७९, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, सुरेश केमेकर, गोपीनाथ नरोटे, गणेश मोहुर्ले, मयूर येरणे आदींनी केली.

बॉक्स

राजुरा येथे दोन ट्रॅक्टर जप्त

राजुरा : तालुक्यातील सिर्सी गावाजवळील वनविभागाच्या क्षेत्रातील ओढ्यातून रेती उपसा करून वाहतूक करताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोन ट्रॅक्टर पकडून भारतीय वन अधिनियमानुसार गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी आठ जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली.

राजुरा वनपरिक्षेत्रातील टेंबूरवाही परिमंडळातील सिर्सी नियत क्षेत्रातील ओढ्यातून उपसा करून ट्रॅक्टरद्वारे रेतीची चोरटी वाहतूक सुरू होती. रात्री गस्त सुरू असताना घटनास्थळी ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३४ - ४६७८, एमएच ३४ - २२३७ हे दोन ट्रॅक्टर आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट, क्षेत्र सहायक कटकू, वनरक्षक वर्षा वाघ, प्रियंका जावळे, चौबे, दिलीप जाधव, वनमजूर विनोद सोयाम, मोहितकर आदींनी केली.

Web Title: Vehicles transporting sand illegally seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.