वेकोलिने कुनाडा गावाचा पाणीपुरवठा केला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:19 AM2021-06-27T04:19:00+5:302021-06-27T04:19:00+5:30
भद्रावती : वेकोलिमार्फत दुसऱ्यांदा पुनर्वसन केलेल्या दत्तक कुनाडा गावाचा वेकोलिने विद्युत पुरवठा खंडित करून पाणीपुरवठा बंद केल्याने नागरिकांची ...
भद्रावती : वेकोलिमार्फत दुसऱ्यांदा पुनर्वसन केलेल्या दत्तक कुनाडा गावाचा वेकोलिने विद्युत पुरवठा खंडित करून पाणीपुरवठा बंद केल्याने नागरिकांची पाण्यासाठी हाहाकार होत आहे. गावकऱ्यांनीच विद्युत भरणा करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, असा अजब फतवा वेकालिने काढल्याने गावकऱ्यांसमोर चिंतेचा विषय बनला आहे. शनिवारी गावकऱ्यांनी वेकोलि प्रबंधक एस. के. भैरवा यांच्या बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन केले.
माजरी एरियातील कुनाडा गावाचे २००६ मध्ये पुनर्वसन करण्यात आले होते. परंतु या गावाच्या अपुऱ्या सोयीसुविधा असल्याने त्या पूर्ण करण्यासाठी पुनर्वसन समिती नेमण्यात आली. त्यानंतर वेकोलिने गावाला दत्तक घेतले व २०१० मध्ये गावाचे पुनर्वसन झाले. आता ११ वर्षाचा काळ लोटत असला तरी वेकोलि अजूनपर्यंत पुनर्वसन झालेल्या गावातील पट्टेसुद्धा गावकऱ्यांच्या नावावर केले नाही. आतापर्यंत वेकोलिमार्फत गावांमध्ये सोयीसुविधा व्यवस्थित चालू असताना वेकोलिचे व्यवस्थापक यांनी ग्रामपंचायत सचिवाला पत्रव्यवहार करून विद्युत पुरवठा खंडित करून येतील पाणी बंद करणार असल्याच्या सूचना केल्या होत्या. यावर काही नागरिकांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली असता व्यवस्थापकांनी गावाला पाणी पाहिजे असेल तर येणाऱ्या विद्युत बिलाचा भरणा करा, असा अजब फतवा काढल्याने येथील गावकरी हतबल झाले आहे. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी शनिवारी सकाळी ९ वाजतापासून वेकोलि व्यवस्थापकाच्या बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन करून विद्युत पुरवठा पूर्ववत चालू करून पाणीपुरवठा सुरू ठेवा, अशी मागणी केली आहे. आता वेकोलिने दत्तक घेतलेल्या गावातील पाण्याची समस्या कोण सोडवणार, असा प्रश्न गावकऱ्यांना समोर पडला आहे.
===Photopath===
260621\img-20210626-wa0041.jpg
===Caption===
वेकोलि ने दत्तक घेतलेल्या कुनाडा गावाचा केला पाणीपुरवठा बंद.