चंद्रपूर जिल्ह्यातील वेळवा सेल्लूर जंगलाला  भीषण आग; प्लॅंटस्टेशनमधील झाडे जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2022 08:47 PM2022-05-24T20:47:25+5:302022-05-24T20:47:52+5:30

Chandrapur News  पोंभुर्णा तालुक्यातील वेळवा सेल्लुर या गावाशेजारी असलेल्या जंगलाला मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान भीषण आग लागल्याने शेकडो हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे.

Velva Cellur forest in Chandrapur district on fire; Burn the trees in the plant station | चंद्रपूर जिल्ह्यातील वेळवा सेल्लूर जंगलाला  भीषण आग; प्लॅंटस्टेशनमधील झाडे जळून खाक

चंद्रपूर जिल्ह्यातील वेळवा सेल्लूर जंगलाला  भीषण आग; प्लॅंटस्टेशनमधील झाडे जळून खाक

Next

चंद्रपूर :  पोंभुर्णा तालुक्यातील वेळवा सेल्लुर या गावाशेजारी असलेल्या जंगलाला मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान भीषण आग लागल्याने शेकडो हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे. सोबतच जंगलानजिक असलेल्या शेतातील तणसीचे ढिगारेही जळून खाक झाले आहेत.

पोंभुर्णा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या दिघोरी बिटातील वेळवा सेल्लुर गावाला लागुन असलेल्या कक्ष क्रमांक ५५१ मधील जंगल व तिथे असलेल्या प्लॅंट स्टेशनला आग लागली. आग एवढी भीषण होती की काही वेळातच शेकडो हेक्टर जंगल जळून खाक झाले. वारा सुसाट्याचा असल्याने जंगलानजीक असलेल्या शेतातही आग पसरली. शेतातील काही तणसीचे ढिगारे जळली असल्याची माहिती आहे.

या परिसरात जंगली प्राण्यांचे वास्तव्य असुन याच परिसरात वाघाचेही वास्तव्य होते. आगीला वेळीच आटोक्यात आणली गेली नाही तर वेळवा व सेल्लुर या गावांना धोका निर्माण होऊ शकतो यासाठी वनविभागाने उपाययोजना करण्याची गरज आहे. नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वनविभागाकडून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.

Web Title: Velva Cellur forest in Chandrapur district on fire; Burn the trees in the plant station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग