उभ्या कपाशीला केले भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 05:00 AM2020-09-27T05:00:00+5:302020-09-27T05:00:14+5:30

शेतकरी नेहमीच अस्मानी व सुलतानी संकटाला तोंड देत असतात. यंदा शेतकºयांनी बँकेतर्फे कर्ज काढून कापूसाची लागवड केली. यंदा पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने पीक चांगलेच बहरले. पिकांना फुलपाती व कळधारणा झाली. एका कपाशीच्या झाडाला १० ते २० पर्यंत बोंडे लागली. त्यामुळे यंदा चांगले उत्पन्न होइल, अशी आशा शेतकऱ्यांना होती.

Vertical cotton flattened | उभ्या कपाशीला केले भुईसपाट

उभ्या कपाशीला केले भुईसपाट

googlenewsNext
ठळक मुद्देकपाशीत रानडुकराचा हैदोस । भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
पळसगाव : बल्लारपूर तालुक्यातील फुलोऱ्यावर आलेल्या सोयाबिनच्या उभ्या पिकांमध्ये रानडुकरांनी हैदोस घालून उभे पीक भुईसपाट केले. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट निर्माण झाले आहे. रानडुकरांचा बंदोबस्त करुन नुकसान भरपाइ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
शेतकरी नेहमीच अस्मानी व सुलतानी संकटाला तोंड देत असतात. यंदा शेतकºयांनी बँकेतर्फे कर्ज काढून कापूसाची लागवड केली. यंदा पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने पीक चांगलेच बहरले. पिकांना फुलपाती व कळधारणा झाली. एका कपाशीच्या झाडाला १० ते २० पर्यंत बोंडे लागली. त्यामुळे यंदा चांगले उत्पन्न होइल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मागील काही दिवसांपासून बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव परिसरात रानडुकरांनी हैदोस घातला आहे. त्यामुळे कपाशीचे मोठे नुकसान होत आले. मार्च महिन्यांत लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांपुढे संकट निर्माण झाले. त्यानंतर बोगस बियानांमुळे दुबार पेरणी करावी लागली. त्यातून जपलेले पीक आता रानडुकराने भुइसपाट केल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे आर्थिक मदत देवून वनविभागाने डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

Web Title: Vertical cotton flattened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.