बल्लारपुरात अत्यल्प पाणी पूरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:27 AM2021-07-29T04:27:53+5:302021-07-29T04:27:53+5:30
मजिप्राच्या पंपात बिघाड होणे हे नित्याचे झाले आहे. यामुळे पाणी पुरवठा करताना अभियंत्यांना तारेवरची कसरत करावी लागते. वर्धा नदीच्या ...
मजिप्राच्या पंपात बिघाड होणे हे नित्याचे झाले आहे. यामुळे पाणी पुरवठा करताना अभियंत्यांना तारेवरची कसरत करावी लागते. वर्धा नदीच्या काठावर बसवलेल्या मशिनरीवर व पंपावर देखरेख ठेवणाऱ्या अभियंत्यांचे दुर्लक्ष होत असल्याने पंपात वारंवार बिघाड होतो. याचा त्रास शहरातील नळधारकांना होत आहे. मजिप्राकडे २०० एच. पी.चे दोन पंप आहेत व ३०० एच. पी.चे दोन पंप आहेत. एकाचे डिस्चार्ज कमी असल्याने पाणी घ्यायला व्यत्यय निर्माण होतो. काही पंपांना १५ वर्षांचा कालावधी होत असल्याने त्याची वेळेअगोदर निगा राखणे तांत्रिक अभियंत्यांचे कर्तव्य आहे. परंतु पंप बंद झाल्यावरच त्याकडे लक्ष जाते. बुधवारी असेच झाले. ३०० एच. पी.च्या पंपात बिघाड झाला व शहराला पाणीपुरवठा कमी झाला.
280721\mmjp.jpg
वर्धा नदीवर असलेली मजीप्रा ची यंत्रणा