वयोवृद्ध लाभार्थी भर उन्हात ताटकळत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 11:12 PM2018-05-21T23:12:56+5:302018-05-21T23:13:08+5:30
तळोधी (बा.) व परिसरातील वयोवृद्ध स्त्री-पुरुष संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी तलाठी कार्यालयात कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी आले. मात्र येथील तलाठी कार्यालयात कुणीच नसल्यामुळे वयोवृध्द लाभार्थ्यांना भर उन्हात ताटकळत रहावे लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोधी (बा) : तळोधी (बा.) व परिसरातील वयोवृद्ध स्त्री-पुरुष संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी तलाठी कार्यालयात कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी आले. मात्र येथील तलाठी कार्यालयात कुणीच नसल्यामुळे वयोवृध्द लाभार्थ्यांना भर उन्हात ताटकळत रहावे लागले.
सोमवारी घडलेल्या या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. येथील तलाठी कार्यालयातील अधिकारी वर्ग हजर नसल्यामुळे वयोवृद्ध स्त्री-पुरुषांना भर उन्हात अनेकवेळा अधिकारी वर्गाची प्रतीक्षा करावी लागते. सध्या तीव्र उन्ह तापत आहे. पारा ४७ अंशापार गेला आहे. दुसरीकडे तलाठी कार्यालयात कोणत्याच सुविधा नाही.
अधिकारी वर्ग वेळेवर हजर राहत नसल्यामुळे संजय गांधी व श्रावण बाळ योजनेच्या वयोवृद्ध लाभार्थ्यांना भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागते. या ठिकाणी वयोवृद्धांना बसण्याची सुविधाही नाही. वरिष्ठांनी याकडे लक्ष द्यावे.
- होमदेव मेश्राम, नागभीड.