घुग्घुस नगर परिषदेच्या मागणीसाठी वीरुगिरी

By admin | Published: August 23, 2014 11:54 PM2014-08-23T23:54:13+5:302014-08-23T23:54:13+5:30

येथील ग्राम पंचायतला नगर परिषदेचा दर्जा देण्याची मागणी करीत इबादुल हसन सिद्दीकी यांनी शनिवारी तहसील कार्यालयाच्या टॉवरवर चढून आंदोलन केले. दरम्यान तहसीलदार गणेश शिंदे

Veurugi for the demand of Boghujas Nagar Parishad | घुग्घुस नगर परिषदेच्या मागणीसाठी वीरुगिरी

घुग्घुस नगर परिषदेच्या मागणीसाठी वीरुगिरी

Next

घुग्घुस : येथील ग्राम पंचायतला नगर परिषदेचा दर्जा देण्याची मागणी करीत इबादुल हसन सिद्दीकी यांनी शनिवारी तहसील कार्यालयाच्या टॉवरवर चढून आंदोलन केले. दरम्यान तहसीलदार गणेश शिंदे यांनी भेट दिली आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करून मागण्यावर चर्चा करुन शासन दरबारी ठेवण्याचे आश्वासन दिले. तब्बल सहा तासानंतर ते खाली उतरले.
घुग्घुस ग्रामपंचायत क्षेत्राची लोकसंख्या ४० हजारांवर आहे. शासनाच्या निकषाप्रमाणे भौगोलिक आणि औद्योगिक क्षेत्र आहे. मागील १५ पूर्वीची मागणी असताना पक्षपाती धोरण राबविले. जिल्ह्यात नगर पंचायती, नगरपालिका दिल्या. मात्र घुग्घुसला नगर पालिका देण्याचे टाळले. त्यामुळे शासन आणि प्रतिनिधींबद्दल गाववासीयांमध्ये प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.
दरम्यान घुग्घुसला नगरपालिका व्हावी यासाठी घुग्घुस नगर परिषद स्थापना संघर्ष समितीचे गठण करण्यात आली. समितीने रास्ता रोको आंदोलन, आमरण उपोषण सुरू केले. दरम्यान शनिवारी संघर्ष समितीचे सचिव इबादुल हसन सिद्दीकी सकाळी ११ वाजता अचानक नायब तहसीलदार कार्यालयाच्या मागील असलेल्या मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन सुरु केले. विरुगिरीची बातमी गावात पसरताच मोठ्या संख्येने टॉवरकडे नागरिकांनी धाव घेतली.
गावात पाणी पुररवठा योजनाचे भुमिपूजन समारंभ असताना अचानक झालेल्या विरुगिरीने चांगलाच झटका बसला. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदार गणेश शिंदे यांनी घुग्घुस गाठून इबादुल सिद्दीकी यांच्याशी संपर्क साधला. मात्र आपल्या मागण्याबाबत शासनाने विचार केल्याशिवाय खाली येणार नाही, अशी भूमिका घेतली. दरम्यान प्रतिनिधीशी तहसीलदार शिंदे यानी चर्चा केली आणि मागण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले. तब्बल सहा तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Veurugi for the demand of Boghujas Nagar Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.