खड्ड्यांमुळे चंद्रपुरात शिक्षिकेचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 11:50 PM2018-07-09T23:50:39+5:302018-07-09T23:50:53+5:30
मुसळधार पावसामुळे चंद्रपूर शहरातील रस्त्यांची वाट लागली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने या खड्ड्यांमुळे एका शिक्षिकेला जीव गमवावा लागल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वाहतूक नियंत्रण शाखेसमोरच घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मुसळधार पावसामुळे चंद्रपूर शहरातील रस्त्यांची वाट लागली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने या खड्ड्यांमुळे एका शिक्षिकेला जीव गमवावा लागल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वाहतूक नियंत्रण शाखेसमोरच घडली.
नंदा प्रमोद बेहरम (५८) रा. वडगाव असे मृत शिक्षिकेचे नाव असून त्या भवानजीभाई हायस्कूलमध्ये कार्यरत होत्या. सोमवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर त्या स्कुटीने घरी जात होत्या. दरम्यान वाहतूक शाखेसमोरील रस्त्यावर खड्डे चुकविण्याच्या नादात सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकची दुचाकीला मागून धडक बसली. ही घटना लक्षात येताच वाहतूक शाखेत कार्यरत कर्मचाºयांनी जखमी शिक्षिकेला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मूल व रामनगर चौकातून जाणाºया वरोरा मार्गाची पावसाळ््यापूर्वी डागडूजी करण्यात आली. मात्र मुसळधार पावसाने खड्डे जैसे-थे झाले आहेत.
ट्रक-दुचाकीची धडक, १७ वर्षीय विद्यार्थी ठार
वरोरा : महाविद्यालयातून घरी जाताना ट्रकला दुचाकीची मागून धडक बसल्याने १७ वर्षीय विद्यार्थी ठार झाल्याची घटना वरोरा शहरातील घाटे चौकात सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. जोगेंद्र पांडुरंग फुलझेले (१७) रा. पद्मालयनगर वरोरा असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. तो आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
टिप्पर-कारच्या धडकेत एक गंभीर जखमी
गेवरा : बोरमाळा नदीघाटावरुन नागपूरला रेती वाहतूक करणाºया टिप्परची समोरून येणाºया कारला धडक बसली. यात कारचालक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी गेवरा बुज बसस्थानक परिसरात घडली. राजेंद्र दादाजी मेश्राम (२६) रा. आकापूर असे जखमीचे नाव आहे. बोरमाळा रेतीघाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक होत असून याकडे मात्र महसूल व पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या घटनेनंतर एमएच ४०-६५३१ क्रमांकाच्या टिप्परचा चालक श्रीकांत धोंडबा मारभत्ते रा. मदनापूर ता. कुही याला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरू आहेत.