कर्जासाठी बळीराजाची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:20 AM2018-05-11T00:20:11+5:302018-05-11T00:20:11+5:30

सध्या एकीकडे लग्नसराई धडाक्यात सुरू आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना तोंडावर आलेल्या खरीप हंगामासाठी लगबग सुरू आहे. मागील वर्षीची कर्जमाफी अनेकांना मिळाली नाही. प्रत्येक शेतकऱ्याला तत्काळ कर्ज द्या, असे शासनाचे निर्देश असले तरी बहुतांश शेतकरी कर्जासाठी बँकाच्या चकरा मारत आहे.

The victim's struggle for loan | कर्जासाठी बळीराजाची धडपड

कर्जासाठी बळीराजाची धडपड

Next
ठळक मुद्देजुळवाजुळव कशी करायची? : अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात दमडीही नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सध्या एकीकडे लग्नसराई धडाक्यात सुरू आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना तोंडावर आलेल्या खरीप हंगामासाठी लगबग सुरू आहे. मागील वर्षीची कर्जमाफी अनेकांना मिळाली नाही. प्रत्येक शेतकऱ्याला तत्काळ कर्ज द्या, असे शासनाचे निर्देश असले तरी बहुतांश शेतकरी कर्जासाठी बँकाच्या चकरा मारत आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात छदामही नसल्याने त्यांची झोप उडाली आहे.
मागील वर्षीचा हंगाम शेतकºयांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. मृग नक्षत्राला पाऊस पडला की जोमात पेरणी करायची, असा त्यांंचा मानस होता. मात्र पावसाने मृगात निराशा केली. पावसाचे आगमन झाले नाही. याशिवाय मागील वर्षी अलनिनोचाही प्रभाव पावसाळ्यावर जाणवला. त्यामुळे पावसाने अनेकवेळा शेतकऱ्यांना दगा दिला. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली. मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला. पाहिजे तसे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले नाही. दुसरीकडे शेतमालालाही भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला गेला. लावलेला पैसाही निघाला नाही. त्यामुळे डोक्यावरील कर्ज तो फेडू शकला नाही. शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्याला दिलासा मिळाला. मात्र तोही क्षणिक ठरला. रबी हंगाम उलटून गेल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.
आता शेतकरी पुन्हा खरीप हंगामाच्या कामाला लागला आहे. हंगामपूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहेत. मात्र हंगामासाठी शेतकऱ्यांना पैसा हवा आहे. प्रत्येक शेतकऱ्यांला कर्जाचे वाटप करा, असे निर्देश शासनाने बँकाला दिले आहे. शेतकऱ्यांना कर्जासाठी त्रास देऊ नका, असे सांगण्यात आले आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना कर्ज मिळालेले नाही.
मागील वर्षीच्या कर्जमाफीचा लाभही शेतकऱ्यांना मिळाला नाही. कोरपना, जिवती, राजुरा, सिंदेवाही, नागभीड, चिमूर तालुक्यातील शेतकरी कर्जासाठी धावपळ करीत आहेत. बँकाच्या चकरा मारत आहेत.
पुन्हा सावकारी पाश
खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, मजूरवर्ग यासाठी पैैशाची गरज आहे. बँकाकडून अद्याप अनेक शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही. हातात पैसा नाही. रबीनेही खिसा गरम केला नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा सावकाराच्या दारात उभे होत आहे. या संधीचा फायदा घेत अनेक अवैध सावकार सक्रिय झाले असून आपला पाश शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती आवळत आहेत.
एटीएम सक्तीमुळे डोकेदुखी
ज्या शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला. त्यांना एटीएम देण्यात आले आहे. शेतकरी आपल्या खात्यातील पैसे विड्राल स्लिप भरून काढू शकत नाही. त्यांना पैसे एटीएमनेच काढावे लागणार आहे. गावखेड्यात एटीएमची सुविधा नाही. शहरातील एटीएममध्ये पैसे असतील, याचा नेम नाही. याशिवाय शेतकºयांना एटीएम हाताळताही येत नाही. त्यामुळे शेतकरी कमालीचा त्रस्त झाला आहे.

Web Title: The victim's struggle for loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी