विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे इरई नदी बचाओ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:19 AM2021-06-22T04:19:45+5:302021-06-22T04:19:45+5:30
चंद्रपूर : इरई नदीवर बंधारा बांधावा या प्रमुख मागणीसाठी माजी खासदार नेरश पुगलिया यांच्या मार्गदर्शनात विदर्भ किसान मजदूर काँग्रेसतर्फे ...
चंद्रपूर : इरई नदीवर बंधारा बांधावा या प्रमुख मागणीसाठी माजी खासदार नेरश पुगलिया यांच्या मार्गदर्शनात विदर्भ किसान मजदूर काँग्रेसतर्फे युवानेते राहुल पुगलिया यांच्या नेतृत्वात राजीव गांधी उड्डाणपुलाच्या खाली नदीपात्रात उतरून इरई नदी बचाव आंदोलन करण्यात आले.
इरई नदीवर पुलाचे बांधकाम झाल्यामुळे राजीव गांधी उड्डाणपुलाच्या खाली मोठ्या प्रमाणात माती व गाळ साचला आहे. तसेच नदीपात्र सभोवताल झाडेझुडपे वाढल्याने नदीपात्राची खोली कमी झाली आहे. इरई नदीचे खोलीकरण व साफसफाई न केल्यामुळे पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत विदर्भ किसान मजदूर कॉंग्रेसतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यात आले होते. दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही नदीपात्राची साफसफाई करण्यात आली नाही. त्यामुळे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इरई नदी बचाओ आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष गजानन गावंडे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक देवेंद्र बेले, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष करण पुगलिया, नगरसेवक अशोक नागापुरे, इंटकचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पोडे, माजी नगरसेवक विनोद पिंपळशेंडे, काँग्रेसचे रतन शिलावार, रामदास वागदारकर, वीरेंद्र आर्या, अनिल तुंगीडवार, सुधाकरसिंह गौर,असलम भाई, दुर्गेश चौबे, राजू लहामगे, अनंता हुड, सुनील बावणे, बाबुलाल करुणाकर, सुनील बकाली आदी सहभागी झाले होते.