विदर्भवादी ओबीसी नेते डाॅ. अशोक जीवतोडे भाजपात जाणार; राष्ट्रवादीला मोठा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2023 07:32 PM2023-06-21T19:32:54+5:302023-06-21T19:34:01+5:30

Chandrapur News विदर्भवादी ओबीसी नेते डाॅ. अशोक जीवतोडे यांनी येथे बुधवारी भाजपात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली.

Vidarbha OBC leader Dr. Ashok Jeevtode will join BJP; Big blow to NCP | विदर्भवादी ओबीसी नेते डाॅ. अशोक जीवतोडे भाजपात जाणार; राष्ट्रवादीला मोठा धक्का

विदर्भवादी ओबीसी नेते डाॅ. अशोक जीवतोडे भाजपात जाणार; राष्ट्रवादीला मोठा धक्का

googlenewsNext

 

चंद्रपूर : विदर्भवादी ओबीसी नेते डाॅ. अशोक जीवतोडे यांनी येथे बुधवारी भाजपात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळापेक्षा फडणवीस सरकारच्या काळात ओबीसींबाबत सर्वाधिक निर्णय झाले. भाजप सरकारच ओबीसींना न्याय देण्यास सक्षम आहे. भाजप प्रवेशामागे हे प्रमुख कारण असल्याचे डाॅ. जीवतोडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

ही राजकीय घडामोड राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. येत्या २५ जूनला चंद्रपुरातील जनता महाविद्यालयाच्या पटांगणावर दुपारी ३ वाजता डाॅ. जीवतोडे यांच्या भाजप प्रवेशाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे स्वत: या सोहळ्याला उपस्थित राहून हा पक्षप्रवेश घडवून आणणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्याच नव्हे, तर विदर्भातील राजकारणातील ही मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे.

डाॅ. जीवतोडे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसला विदर्भात वजनदार ओबीसी नेता लाभला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण होते. या काळात राष्ट्रवादीचे सर्वच नेते डाॅ. जीवतोडे यांच्याकडे येऊन गेले. मात्र, पक्षाने जीवतोडे यांच्यावर कोणतीच महत्त्वाची जबाबदारी सोपविली नाही. परिणामी, जीवतोडेंचा अपेक्षाभंग झाला. ‘ओबीसी नेते’ म्हणून ते ओळखले जातात. महाविकास आघाडीच्या काळात ओबीसींना न्याय मिळवून देऊ शकलो नाही, याची खंत त्यांना आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर ते नाराज असल्याचा सूर होता. नेमक्या याच संधीचे भाजपने सोने केले. नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपुरातील मातोश्री वृद्धाश्रमात डाॅ. जीवतोडे यांच्याशी बंदद्वार चर्चा केली. यावेळी डाॅ. जीवतोडे यांना भाजपची ऑफर दिली तेव्हापासून डाॅ. जीवतोडे यांचे मन राष्ट्रवादीत रमत नव्हते.

भाजपची खेळी यशस्वी

चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या हयातीतच डाॅ. अशोक जीवतोडे हे भाजपत जाणार असल्याची चर्चा होती. या प्रवेशापूर्वी दुर्दैवाने खासदार धानोरकर यांचे अकाली निधन झाले. धानोरकर हे ओबीसी नेते होते शिवाय ते कुणबी समाजाचेही नेते होते. त्यांच्या जाण्याने कुणबी समाजाची मोठी हानी झाली. ही पोकळी भरून काढण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून कुणबी समाजाला लोकसभेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे. डाॅ. अशोक जीवतोडे या चौकटीत सर्व बाजूने तंतोतंत बसतात. त्यांची प्रतिमाही स्वच्छ आहे. ते सर्वांशी जुळवून घेतात. या पार्श्वभूमीवर भाजपने ही यशस्वी खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: Vidarbha OBC leader Dr. Ashok Jeevtode will join BJP; Big blow to NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.