बल्लारपूर ठरला विदर्भातील पहिला हागणदारीमुक्त तालुका
By admin | Published: October 8, 2016 01:42 AM2016-10-08T01:42:04+5:302016-10-08T01:42:04+5:30
विदर्भात पहिला हागणदारीमुक्त तालुका ठरण्याचा मान बल्लारपूरला मिळाला आहे. त्याकरिता बल्लारपूर
पुण्यात गौरव : बल्लारपूर पंचायत समितीची उल्लेखनीय कामगिरी
चंद्रपूर : विदर्भात पहिला हागणदारीमुक्त तालुका ठरण्याचा मान बल्लारपूरला मिळाला आहे. त्याकरिता बल्लारपूर पंचायत समितीचा पुणे येथे गौरव करण्यात आला आहे.
बल्लारपूर हागणदारीमुक्त तालुका ठरल्यामुळे पुणे येथे नुकत्याच झालेल्या सरपंच मेळाव्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौरव केला आहे. कार्यक्रमाला याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) विपुल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) रवींद्र मोहिते, स्वच्छ भारत मिशनचे कृष्णकांत खानझोडे, विस्तार अधिकारी नैताम, बीआरसी सुवर्णा जोशी, सीआरसी सुनील नुत्तलवार आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. डी. सिंह यांना बल्लारपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भुजंग गजभे यांच्या कामगिरीचे कौतुक केले. गजभे यांना बल्लारपूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करुन, विदर्भातील पहिला तालुका हागणदारीमुक्त करण्याचा मान मिळविल्याबद्दल व त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल सन्मानित करण्यात आले आहे. पुढील काळात अशाच प्रकारची विविध योजनांमधून भरीव कामगिरी करावी व जिल्ह्याचे नाव चांगल्या कामातून नावलौकीक करावा, अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी. सिंह यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
विदर्भातून पहिला हागणदारीमुक्त तालुका म्हणून बल्लारपूर पंचायत समितीला मिळालेले यश हे खरोखरीच उल्लेखनिय आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील उर्वरीत पंचायत समिती अंतर्गत सुद्धा अशाच प्रकारे कामे झाल्यास जिल्हा हागणदारीमुक्त होण्यास वेळ लागणार नाही.
- एम.डी.सिंह
मुख्य कार्यकारी अधिकारी