व्हिडीओ कॉन्फरन्सने साधला संवाद
By admin | Published: February 13, 2017 12:40 AM2017-02-13T00:40:17+5:302017-02-13T00:40:17+5:30
चंद्रपूर तालुक्यातील ताडाळी बीट आपल्या कर्तुत्वाची पताका डौलाने फडकवत असतानाच तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रयोग करण्यातही आपण मागे नाही,
चंद्रपूर : चंद्रपूर तालुक्यातील ताडाळी बीट आपल्या कर्तुत्वाची पताका डौलाने फडकवत असतानाच तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रयोग करण्यातही आपण मागे नाही, हे या बिटाने दाखवून दिले. त्याचाच प्रत्यय जि.प. उच्च प्राथमिक शाळा चिंचाळा येथील विद्यार्थ्यांनी सातारा जिल्ह्यातील पुळकोटी येथील विद्यार्थ्यांशी व्हिडीओ कान्फरन्सद्वारे संवाद साधून दिला.
आपल्या तंत्रज्ञानामुळे प्रसिद्ध असलेले पुळकोटी सातारा येथील तंत्रस्नेही शिक्षक बालाजी जाधव व त्यांच्या मुलांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्याची संधी चिंचाळा शाळेतील मुलांना मिळाली. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) गारकर तसेच प्राचार्य पाटील उपस्थित होते. बिटातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षणविस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख या व्हीडीओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते. चिंचाळा येथे डिजिटल वर्गखोलीचे उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने व्हिडिओ कॉन्फरन्स घेणारी जिल्ह्यातील पहिली शाळा चिंचाळा ठरली. याकरिता फटींग, भोयर, खोब्रागडे यांची प्रेरणा व चिंचाळा येथील मुख्याध्यापक साखरकर यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)