विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमी अद्यापही उपेक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 10:49 PM2019-02-27T22:49:43+5:302019-02-27T22:50:03+5:30

विसाव्या शतकातील लोककलेने रसिकांच्या आश्रयावर श्रीमंती मिळविली. मनोरंजनासोबत तिने समाज प्रबोधन केले. पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीने लोकाश्रय प्राप्त केला. पण राजाश्रय न मिळाल्यामुळे उपेक्षितच असल्याची खंत प्रसिद्ध सिनेकलावंत मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केली.

The Vidhbari shrine is still neglected | विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमी अद्यापही उपेक्षितच

विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमी अद्यापही उपेक्षितच

Next
ठळक मुद्देमकरंद अनासपुरे यांची खंत : विसापुरात आयोजित नाट्यप्रयोगप्रसंगी ‘लोकमत’शी संवाद

अनेकश्वर मेश्राम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : विसाव्या शतकातील लोककलेने रसिकांच्या आश्रयावर श्रीमंती मिळविली. मनोरंजनासोबत तिने समाज प्रबोधन केले. पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीने लोकाश्रय प्राप्त केला. पण राजाश्रय न मिळाल्यामुळे उपेक्षितच असल्याची खंत प्रसिद्ध सिनेकलावंत मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केली.
विसापूरात संत रविदास मंडळाने संजय ठाकरे लिखित रंगकर्मी रंगभूमीमार्फत ‘बाळा जगू कशी तुज्याविना’ हा नाट्यप्रयोग झाला. यानिमित्ताने आले होते. दरम्यान, त्यांनी ‘लोकमत’शी बातचित करताना ही खंत व्यक्त केली.
मराठी रंगभूमी व झाडीपट्टी रंगभूमी यामध्ये नेमकी तफावत काय? यावर विचार मांडताना मकरंद अनासपुरे म्हणाले, मराठी रंगभूमीचे नाटक प्रायोजकांपुरते चालते. झाडीपट्टी रंगभूमीचे मात्र तसे नाही. झाडीपट्टीला लोककलेचा समृद्ध व ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या भागातील रसिकांनी तो जपला आहे. ही लोकाश्रयाची ताकद आहे. झाडीपट्टी रंगभूमीचा प्रवास प्रतिथयश वाटचालीकडे असून मराठी रंगभूमीप्रमाणे झाडीपट्टी रंगभूमीला राजाश्रय मिळणे गरजेचे आहे. झाडीपट्टी रंगभूमीचे नाटक आशय विषयाची अपूवार्ही वैशिष्ट्य आहे. म्हणूनच रसिकराज येथील रंगभूमीला आपलेसे करतात.
आपण झाडीपट्टी रंगभूमीच्या नाटकातील भूमिका साकारताना कसे वाटते, यावर धीरगंभीर आवाजात मकरंद अनासपुरे म्हणाले, विदर्भाच्या झाडीपट्टी रंगभूमीने नाट्यसंपदा जपली. नेपथ्य, प्रकाश, संगीताचे तंत्र प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आहे. कलावंतांच्या संवादातून सामाजिक बांधिलकीचा संदेश, प्रबोधनात्मक नाट्यप्रयोग पे्रक्षकांना आवडतात. म्हणून येथील नाटकाला रसिकांची दिवस उजाडेपर्यंतची गर्दी झाडीपट्टी रंगभूमीसाठी अभिमानास्पद आहे. मीच नाही तर अनेक सिनेकलावंतांनी झाडीपट्टी रंगभूमीवर अलोट प्रेमाचा वर्षाव केला आहे, असेही मकरचंद अनासपुरे म्हणाले.
लोककलेला रसिकांचे पाठबळ
विदर्भातील वडसा (देसाईगंज), नवरगाव, सिंदेवाही या भागात जवळपास ५५ ते ६० नाट्यमंडळे असून, रंगभूमीला गौरवशाली करणारी हीच मंडळे आहेत. नोव्हेंबरपासून मार्च महिन्यापर्यंत गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर व वर्धा जिल्ह्याचा सीमावर्ती भाग झाडीपट्टी रंगभूमीने व्यापलेला असतो. झाडीपट्टी रंगभूमीचा नाट्यप्रपंच ग्रामीण भागातील कष्टकरी लोकाश्रयावर अवलंबून आहे. शतकाची परंपरा असलेल्या लोककलेला रसिकराज जनतेचे पाठबळ आहे. मराठी रंगभूमीकडे प्रेक्षकांनी पाठ फिरविली. मात्र मनोरंजनासोबतच प्रबोधन घडविणारी झाडीपट्टी रंगभूमी तग धरून आहे. या रंगभूमीचा उपेक्षितपणा दूर सारणे गरजेचे आहे.

Web Title: The Vidhbari shrine is still neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.